CBSE OSM Row | सीबीएसई अध्यक्ष आणि सचिवांची तडकाफडकी बदली

ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणालीसाठी सेवांच्या खरेदी प्रक्रियेची चौकशी साठी समिती स्थापन
CBSE OSM Row
CBSE OSM Row (प्रतिकात्‍मक छायाचित्र) Pudhari
Published on
Updated on

CBSE OSM Row

नवी दिल्ली : ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) पद्धतीवरून सुरू असलेल्या तीव्र वादाच्या पार्श्वभूमीवर, मंगळवारी सीबीएसई (CBSE) चे अध्यक्ष राहुल सिंग आणि सचिव हिमांशू गुप्ता यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणालीसाठी सेवांच्या खरेदी प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी सरकारने एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे. 'कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशन'च्या अध्यक्षा एस. राधा चौहान या समितीचे नेतृत्व करतील.

'ऑन-स्क्रीन मार्किंग' वादाच्‍या भोवर्‍यात

सीबीएसईने याच वर्षी इयत्ता १२ वीच्या मूल्यमापनासाठी पूर्णपणे डिजिटल 'ऑन-स्क्रीन मार्किंग' (OSM) प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग अस्पष्ट असणे, काही पाने गहाळ असणे आणि काही प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांना दुसऱ्याच उमेदवाराची उत्तरपत्रिका दाखवली जाणे, अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्यानंतर या वादाला तोंड फुटले.

CBSE OSM Row
CBSE OSM Controversy | "मी पूर्ण जबाबदारी घेतो.." : CBSE OSM वादावर केंद्रीय शिक्षण मंत्री नेमकं काय म्‍हणाले?

उत्तरपत्रिका मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी

उत्तरपत्रिका मिळवण्यासाठी हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर आणि ऑनलाइन पेमेंट करण्यात तांत्रिक अडचणी आल्यानंतर, उद्भवलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी आयआयटी (IIT) आणि आयआयएम (IIM) मधील तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे.

CBSE OSM Row
Rahul Gandhi on CBSE Result | सीबीएसई निकाल प्रकरण चूक नसून पूर्वनियोजित कट : राहुल गांधींचा आरोप

लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधींचे गंभीर आरोप

या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळातही मोठा वाद पेटला आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली असून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. मूल्यमापनाचे काम ज्या खाजगी कंपनीला देण्यात आले, तिच्या निवडीवर राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.राहुल गांधी म्हणाले की, या कंपनीने २०११ मध्ये तेलंगणामध्ये दुसऱ्या नावाने अशीच गडबड केली होती. "ज्या 'कोएम्प्ट' (Coempt Edu Teck) कंपनीकडे ऑन-स्क्रीन मार्किंगची जबाबदारी सोपवण्यात आली होती, तिने २०१९ मध्ये तेलंगणामध्ये 'ग्लोबारेना' (Globarena) या नावाने असाच प्रकार केला होता. नाव बदलले पण हेतू आणि स्वरूप तेच आहे. सर्वांना तिचा इतिहास माहीत असतानाही कंत्राट देण्यात आले... ही चूक नाही, तर हा एक जाणीवपूर्वक केलेला कट आहे," अशी टीका राहुल गांधी यांनी 'X' वर केली होती.

CBSE OSM Row
NEET UG 2026 Controversy:पेपर लीक या टर्मलाच भाजपचा विरोध... संसदीय समितीच्या बैठकीत NEET वर वादळी चर्चा

सीबीएसईने दिले होते स्पष्टीकरण

सीबीएसईने एक निवेदन जारी करून सांगितले की, हे कंत्राट हैदराबादच्या 'कोएम्प्ट एडू टेक' कंपनीला देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे: "या एजन्सीला कंत्राट देताना सीबीएसईने 'सामान्य वित्तीय नियमांच्या' (GFR) सर्व प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले आहे. सीबीएसईने २०२६ च्या बोर्ड परीक्षांच्या उत्तरपत्रिकांच्या डिजिटल मूल्यमापनासाठी २८.०८.२०२५ रोजी सेंट्रल पब्लिक प्रोक्युरमेंट पोर्टलवर 'आरएफपी' (RFP - Request for Proposal) जारी केला होता आणि त्यानुसार पात्र ठरलेल्या बोलीदाराला हे कंत्राट देण्यात आले."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news