रस्ते अपघातग्रस्तांना दिलासा; जखमींवर कॅशलेस उपचार - केंद्राची घोषणा

Cashless treatment for Road Accident victims | कोणत्याही रस्त्यावर झालेल्या अपघातासाठी मिळणार मदत - नितीन गडकरी
Cashless treatment for Road Accident victims, Nitin Gadkari said
रस्ते अपघातात जखमींवर कॅशलेस उपचार होणार आहेत.File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : रस्ते अपघातातील जखमींवर आता कॅशलेस पद्धतीने उपचार होणार आहेत. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत दिड लाखापर्यंत हे उपाचर केले जाणार आहेत. ही योजना सध्या प्रायोगिक तत्त्वावर चंदीगड आणि आसाममध्ये सुरू करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, रस्ते वाहतूक मंत्रालय यांच्यावतीने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत या योजनेची माहिती देण्यात आलेली आहे. वाहनामुळे झालेला अपघात, तसेच तो कोणत्याही रस्त्यावर झाला असेल तरीही हे उपचार मिळणार आहेत. ही बातमी Financial Express ने दिलेली आहे.

Motor Vehicle Accident Fund मधून होणार खर्च

"या योजनेत लाभार्थींना ट्रॉमा आणि पॉलिट्रॉमा संबंधित उपचार नोंदणीकृत हॉस्पिटलमध्ये केले जातील. जास्तीजास्त दीड लाखापर्यंतचा खर्च या अंतर्भूत आहे. अपघात झाल्यानंतर सात दिवसांत झालेल्या उपचारांचा खर्च यात केला जाईल," असे PIBने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. (Cashless treatment for Road Accident victims)

मंत्रलायने Motor Vehicle Accident Fund गठित केलेला आहे, त्यातून हा उपचाराचा खर्च केला जाणार आहे. ही योजना राबवण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, रस्ते वाहतूक मंत्रालय, स्थानिक पोलिस, नोंदणीकृत हॉस्पिटल, राज्य सरकारची आरोग्य यंत्रणा, जनरल इन्शुरन्स काऊन्सिल यांच्या समन्वयातून या योजनेची अंमलबजावणी केली जाईल.

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (PMJAY)

Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana (PMJAY) या योजनेत कुटुंबाला ५ लाखापर्यंतचा आरोग्य विमा संरक्षण दिले जाते. ही योजना कॅशलेस आणि पेपरलेस पद्धतीने राबवली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news