A case has been registered against Mahua Moitra
महुआ मोईत्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखलPudhari File Photo

टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल

महिला आयोगाच्या अध्यक्षांवर अपमानास्पद पोस्टचा केल्याचा आरोप
Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुखांबद्दल 'अपमानास्पद' सोशल मीडिया पोस्ट केल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी लोकसभा सदस्य महुआ मोईत्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, टीएमसी खासदार मोहुआ मोईत्रा यांनी केलेले ट्वीट बद्दल गुन्हा करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रीय महिला आयोगाकडून करण्यात आला आहे. तक्रारीची दखल घेऊन आणि त्यातील मजकुराच्या प्राथमिक तपासणीनंतर, पीएस स्पेशल सेलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.

काय प्रकरण आहे

हाथरस प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या भेटीबाबत टीएमसी खासदारांनी पोस्ट केली होती. मोइत्रा यांनी पोस्टसोबत व्हिडिओही शेअर केला होता. व्हिडिओमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख उत्तर प्रदेशातील हाथरस येथील चेंगराचेंगरीच्या ठिकाणी पोहोचल्याचे दाखवले आहे, त्यावर महुआने टिप्पणी केली, ती तिच्या बॉसचा पायजमा हाताळण्यात खूप व्यस्त आहे. यानंतर महुआने आपली पोस्ट काढून टाकली होती.

A case has been registered against Mahua Moitra
Mahua Moitra | महुआ मोईत्रा यांची खासदारकी धोक्यात, लोकसभेतून हकालपट्टीची समितीची शिफारस

महुआ मोईत्रा यांच्या पोस्टवर महिला आयोगाने आक्षेप नोंदवला

महुआ मोइत्राच्या पोस्टमुळे संतप्त झालेल्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुखांनी सोशल मिडिया 'एक्स' वर पोस्ट टाकली. ज्यामध्ये असे म्हटले होते की, असभ्य टिप्पणी अपमानास्पद आहे. हे स्त्रीच्या सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. आयोगाला आढळले की ही टिप्पणी भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 79 अंतर्गत येते. एनसीडब्ल्यूने सांगितले की ते अपमानजनक टिप्पण्यांचा तीव्र निषेध करते आणि मोईत्रा यांच्यावर कठोर कारवाई करू इच्छिते. एनसीडब्ल्यूने पुढे लिहिले की, मोइत्रा यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात यावा आणि कारवाईचा तपशीलवार अहवाल तीन दिवसांत आयोगाला कळवावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news