

पुढारी ऑनलाईन :
राजस्थानच्या करौली जिल्ह्यात मंगळवारी रात्री एक मोठा अपघात झाला. येथे एका खासगी बस आणि कारची भीषण धडक झाली. या अपघातात कारमध्ये बसलेल्या ५ लोकांचा मृत्यू झाला, तर बसमधील १५ प्रवाशी जखमी झाले. या अपघातात जखमी झालेल्या लोकांना उपचारांसाठी रूग्णालयात भरती करण्यात आले आहे.