Assembly by-elections | पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका जाहीर; निवडणूक आयोगाची घोषणा

निवडणूक आयोगाने पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये १९ जून रोजी पोटनिवडणुका घेण्याची घोषणा केली आहे.
Assembly by-elections
Assembly by-elections | पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका जाहीर; निवडणूक आयोगाची घोषणाFile Photo
Published on
Updated on

मुंबई : भारतीय निवडणूक आयोगाने गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल येथील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये १९ जून रोजी पोटनिवडणुका घेण्याचे जाहीर केले आहे.

गुजरातमधील कडी (अनुसूचित जाती) मतदारसंघात कर्सनभाई पंजाभाई सोलंकी यांच्या निधनामुळे तर विसावदर मतदार संघाचे आमदार भायाणी भूपेंद्रभाई गांधीभाई यांच्या राजीनाम्यामुळे पोटनिवडणूक होणार आहे. केरळमधील निलांबूर येथे पी. व्ही. अनवर यांच्या राजीनाम्यामुळे, पंजाबमधील लुधियाना पश्चिममध्ये गुरप्रीत बसी गोगी यांच्या निधनामुळे तर पश्चिम बंगालमधील कालिगंजचे आमदार नासिरुद्दीन अहमद यांच्या निधनामुळे या निवडणुका घेण्यात येणार आहेत.

Assembly by-elections
Operation Sindoor : "आम्हाला पाकिस्तानशी युद्ध करण्‍यात रस नाही; पण यापुढे आम्‍ही..." : शशी थरुर अमेरिकेत नेमकं काय म्‍हणाले?

सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट वापरण्यात येणार आहेत. मतदार ओळखीकरिता निवडणुक ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, इत्यादी १२ पर्यायी मान्य असतील. या पाचही ठिकाणी आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनी त्यांची माहिती जाहीर करणे बंधनकारक आहे, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे.

निवडणुकीचे वेळापत्रक

  • अधिसूचना : २६ मे

  • नामनिर्देशन करण्याची अंतिम तारीख : २ जून

  • नामनिर्देशन छाननी : ३ जून

  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : ५ जून

  • मतदान : १९ जून

  • मतमोजणी : २३ जून 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news