पुढारी ऑनलाईन डेस्क :उत्तराखंडमधील भीमताल शहराजवळ आज (दि.२५) बस दरीत कोसळली. या भीषण अपघात चार जण ठार तर २४ हून अधिक जण जखमी झाले आहेत.
बस अल्मोडा येथून हल्द्वानीकडे जात असताना भीमतालजवळ बस थेट दरीत कोसळली. बस अनेक प्रवासी बसमधून बाहेर फेकले गेले. घटनास्थळी 'एसडीआरएफ'चे पथक स्थानिक पोलिस, स्थानिक लोक आणि अग्निशमन विभागाने धाव घेतली. बचावकार्य सुरू असून, प्रवाशांना दरीत बाहेर काढले जात आहे. या भीषण अपघातात चार जण ठार झाले आहेत.जखमींना भीमताल येथे नेण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.