Budget 2024-25 : काय स्वस्त, काय महाग?

केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन 'या' वस्‍तूंच्‍या कस्टम ड्युटीत कपात
Budget 2024-25 : काय स्वस्त, काय महाग?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प जाहीर झाल्‍यानंतर आता कोणत्‍या वस्‍तू स्‍वस्‍त आणि महाग हाेतील याविषयी जाणून घेवूया...

अर्थमंत्र्यांनी मोबाइल फोन, मोबाइल चार्जरवरील बीसीडी १५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली. सोने आणि चांदीवरील सीमाशुल्क ( कस्टम ड्युटी) ६ टक्के आणि प्लॅटिनमवर ६.४. टक्के कपता केला आहे.तीन कॅन्सर उपचार औषधांना मूळ सीमा शुल्कातून सूट देण्यात आली आहे. सौर पॅनेलच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या सूट भांडवली वस्तूंची यादी वाढवण्याचाही प्रस्ताव दिला आहे.

काय झाले स्वस्त?

एक्स-रे मशीन्स, कर्करोगाची औषधे, मोबाईल फोन, मोबाईल फोनचे भाग, मोबाईल फोन चार्जर, सोलर सेल, सौर पॅनेल, इलेक्ट्रिक वाहने, पादपात्रे, सोने आणि चांदी, प्लॅटिनमपासून बनवलेल्या वस्तू, आयात केलेले दागिने.

काय झाले महाग?

स्फोटक बनवण्यासाठी वापरले जाणारे अमोनियम नायट्रेट महागणार आहे. त्‍याबराेबरच जाहिरातींसाठी वापरल्या जाणाऱ्या फ्लेक्स किंवा बॅनरवरील कस्टम ड्युटी आणखी महाग होईल त्यावरील बीसीडी 10 टक्क्यांवरून 25 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news