'बीएसएफ'ने तस्करांची 'नशा' उतरवली.! कोट्यवधी रुपयांचे अवैध 'कफ सिरप' जप्‍त

भारत-बांगलादेश सीमेवर धडक कारवाई : कफ सिरफच्‍या ६२,२०० बाटल्या जप्‍त
BSF seizes Phensedyl
पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर सीमा सुरक्षा दलाने ( बीएसएफ)ने धडक कारवाई करत तब्‍बल १.५ कोटी रुपयांचे बंदी असलेले कप सिरफच्‍या बाटल्‍या जप्त केल्‍या आहेत. (Image source- X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर सीमा सुरक्षा दलाने ( बीएसएफ)ने धडक कारवाई करत तब्‍बल १.५ कोटी रुपयांचे बंदी असलेले कप सिरफच्‍या बाटल्‍या जप्त केल्‍या आहेत. तस्‍कर ते बांगला देशात नेणार होते यापूर्वी धडक कारवाई करण्‍यात आली.

पश्‍चिम बंगालमधील नादिया जिल्‍ह्यात कारवाई

बांगलादेशात बंदी असलेल्‍या कफ कफ सिरपचा वापर नशेसाठी केला जातो. बांगला देश सरकारने अशा प्रकारच्‍या कफ सिरफवर बंदी घातली आहे. पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात नागहाटा भागात भारत-बांगलादेश सीमेवरील गावातील एका झोपडीत कफ सिरफच्‍या बाटल्‍यांचा साठा केला असल्‍याची गौपनीय माहिती 'बीएसएफ'ला मिळाली होती.

भूमिगत साठवण टाक्यांमधून ६२,२०० कफ सिरफच्‍या बाटल्या जप्त

कारवाई संदर्भात माहिती देताना बीएसएफचे डीआयजी (पीआरओ) निलोत्पल कुमार पांडे यांनी सांगितले की, "आम्हाला विश्वासार्ह सूत्रांनी भूमिगत साठवण टाक्यांमध्‍ये बेकायदा कफ सिरफचा मोठा साठा असल्‍याची माहिती दिली होती. यापैकी दोन टाक्या दाट झाडीखाली होत्या, तर एक टाकी सीजीआय शीटपासून बनवलेल्या झोपडीखाली बांधली होती. या कारवाईत तीन भूमिगत साठवण टाक्यांमधून फेन्सेडिलच्या ६२,२०० बाटल्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. फेनसिडिल कफ सिरप हे बांगलादेशात बंदी घातलेले अंमली पदार्थ आहे. ते अनेकदा भारतातून बांगलादेशात तस्करी केले जाते. बीएसएफने केलेली कारवाई अमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांना मोठा धक्का आहे. . या तस्करीच्या प्रयत्नात सहभागी असणार्‍यांची आणि त्‍यांच्‍या ठिकाणांची ओळख पटविण्यासाठी सखोल चौकशी सुरू असल्याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news