ब्रिटिश पीएम ऋषी सुनाक यांची अक्षरधाम मंदिरात सपत्नीक पूजा

ब्रिटिश पीएम ऋषी सुनाक यांची अक्षरधाम मंदिरात सपत्नीक पूजा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक तसेच त्यांच्या सौभाग्यवती अक्षता यांनी रविवारी येथील अक्षरधाम मंदिरात पूजा-अर्चना केली. स्वामीनारायण मंदिराच्या प्रमुख पुरोहितांनी सुनाक दाम्पत्याचे स्वागत केले. नंतर मुख्य मंदिरातील गर्भगृहात पूजाविधी आटोपला. सुमारे पाऊण तास हे दाम्पत्य मंदिरात होते. मुख्य मंदिरामागील आणखी एका मंदिरात जाऊन दोघांनी जलाभिषेक केला. मंदिराच्या चारही बाजूंना सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली होती.

सुनाक यांनी जमिनीवर वाकून देवाला वंदन केले. आरती केली. मंदिरातील संतांनी दोघांसोबत छायाचित्रेही काढून घेतली. मंदिराच्या वतीने सुनाक यांचा अभिषेक करण्यात आला. दाम्पत्याला स्मृतिचिन्हही देण्यात आले. गजेंद्र पीठाचे दर्शनही उभयतांनी घेतले.

हिंदू असण्याचा मला गर्व आहे. वेळेअभावी मी जन्माष्टमी साजरी करू शकलो नव्हतो. अक्षरधाम मंदिरातील आजची पूजा ही त्याची भरपाई आहे, असे समजा.
– ऋषी सुनाक, पंतप्रधान, ब्रिटन

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news