संसद, लाल किल्ल्यावर बॉम्ब हल्ल्याच्या धमकीचा केरळच्या खासदाराला कॉल

गुरपतवंत सिंह पन्नू नावाने कॉल आल्याची माहिती
India's Parliment
संसद आणि लाल किल्ल्यावर बॉम्ब हल्ला करणार असल्याच्या धमकीचा कॉल खासदाराला आला आहे. Pudhari File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : संसद आणि लाल किल्ल्यावर बॉम्ब हल्ला करणार असल्याच्या धमकीचा कॉल केरळच्या सीपीआय (एम) पक्षाचे राज्यसभा खासदार व्ही. शिवदासन यांना आला. यासंबंधी त्यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांना पत्र लिहून कळवले. 'सिख्स फॉर जस्टिस' या संघटनेकडून गुरपतवंत सिंह पन्नूच्या नावाने हा कॉल आल्याचे खासदारांनी सांगितले.

India's Parliment
Microsoft Outage | मायक्रोसॉफ्ट आउटेजमुळे दिल्ली विमानतळावर प्रवाशांना फटका

राज्यसभा सभापतींनी लिहीलेल्या पत्रात खासदार शिवदासन यांनी म्हटले आहे की, मला २१ जुलै २०२४ रोजी रात्री साडेअकरा वाजता एका अनोळखी नंबरवरून धमकी देणारा कॉल आला. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लाउंजमध्ये खासदार ए. रहीम यांच्यासमवेत असताना कॉल आल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. या प्रकरणी खासदारांनी नवी दिल्लीच्या प्रभारी डीसीपींना कळवले आहे आणि अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news