जम्मू -काश्मिर विमानतळावर  बॉम्बस्फोट | पुढारी

Published on
Updated on

श्रीनगर; पुढारी ऑनलाईन : जम्मू येथील विमानतळावरील तांत्रिक विभागात पहाटे बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात दोघे जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या ठिकाणी बॉम्ब शोध पथके पाठविण्‍यात आली असून यामागे दहशतवाद्यांचा हात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भारतीय हवाई दलाकडून चालवल्या जाणाऱ्या सतवारी हवाई दल स्टेशनवर हा स्फोट झाला.या हल्‍ल्‍यात दाेन जवान जखमी झाले आहेत. 

वाचा : धोनीच्या 'या' फोटोवरून सोशल मीडियावर गोंधळ

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट भारतीय हवाई दलाचे जेथे कामकाज चालते त्या भागात झाला. स्फोटामुळे परिसर हादरला. काही वेळाच्‍या अंतराने एका पाठाेपाठ एक दाेन स्फोट झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि लष्कराची शोधपथके रवाना झाली. तसेच बॉम्ब शोध आणि निकामी करणारी पथके घटनास्थळी दाखल झाले. पहाटे २ वाजता झालेल्‍या स्फोटात दोघेजण जखमी झाल्‍याचा दावा केला जात असला तरी ही संख्या वाढू शकते, असे सूत्रांनी सांगितले.  

वाचा : कोवोवॅक्स लसीची पुण्यासह देशभरात होणार चाचणी 

या स्‍फोटात दोन जवान जखमी झाले आहेत. संपूर्ण परिसराला सील करण्‍यात आले आहे. जम्‍मूतील सुरक्षा व्‍यवस्‍थेतही वाढ करण्‍यात आली आहे. दोन्‍ही स्‍फोट हे कमी तीव्रतेचे होते. यामध्‍ये इमारतीचे छताचे किरकोळ नुकसान झाले.  विमानतळावरील तांत्रिक विभागातील उपकरांचे नुकसान झालेले नाही. पी-१६ ड्रोनचा हल्‍ल्‍यासाठी वापर केला असण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे. ड्राेनचा हा प्रकार खूप कमी उंचीवरुन हवेत संचार करु शकताे त्‍यामुळे तो रडारच्‍या नजरेतूनही सुटतो. एका विमानाला लक्ष्‍य करण्‍यासाठी हा हल्‍ला करण्‍यात आला असावा, अशी शक्‍यताही सूत्रांनी व्‍यक्‍त केली आहे. 

स्‍फोटानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एअर मार्शल एच. एच. अरोरा यांच्‍याशी चर्चा केली. जम्‍मूमधील विमानतळ हे मकवाल सीमेपासून पाच किलोमीटर अंतररावर आहे. घटनास्‍थळी राष्‍ट्रीय तपास संस्‍थेच्‍या  (एनआयए) पथकासह एनएसजी कमांडो पथक दाखल झाल्‍याचे सूत्रांनी स्‍पष्‍ट केले. 

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news