

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये भोजपूर पोलीस ठाणे हद्दीतील एका पेपर मिलमध्ये भीषण बॉयरलचा स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. गौ अत्रौली येथे असलेल्या नॉर्दर्न ईस्टर्न रबर अँड रोल फॅक्टरीत बॉयलर बसवण्यात आला होता. अपघातानंतर प्रशासनाने त्वरित कारवाई करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी तपास सुरू आहे.
या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अधिकृत तपासाअंती दुर्घटनेची नेमकी कारणे स्पष्ट होतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. बॉयलरच्या स्फोटामुळे योगेंद्र कुमार, अनुज आणि अवधेश कुमार या तीन कामगारांचा मृत्यू झाला. त्याचवेळी आणखी एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. याबाबतचे वृत्त 'आयएएनएस' वृत्तसंस्थेने दिले आहे.