बिहारमध्ये गंगा नदीत बोट उलटली; एकाच कुटुंबातील १३ जणांना वाचवले, ४ जण बेपत्‍ता

एकाच कुटुंबातील १३ जणांना वाचवले
एकाच कुटुंबातील १३ जणांना वाचवले
Published on
Updated on

पटना : पुढारी ऑनलाईन राजधानी पटना जवळ एक मोठी दुर्घटना घडली आहे. गंगा नदीत बोट उलटून अनेक लोक बुडाल्‍याचे समोर आले आहे. या बोटीत जवळपास १७ लोक बसले होते. त्‍यातील १३ लोकांना वाचवण्यात यश आले आहे. तर अजुन ४ लोक बेपत्‍ता आहेत.
गंगा दसऱ्यानिमित्त एका कुटूंबातील १७ जण गंगा स्नान करण्यासाठी एका बोटीने जात होते. या दरम्यान हा अपघात घडला.

या विषयी अधिक माहिती अशी की, बिहारच्या पटना येथे गंगा नदीत बोट उलटल्‍याची घटना समोर आली आहे. गंगा नदीला पूर आलेला आहे. या दरम्‍यान गंगा दसऱ्याचा सण सुरू आहे. त्‍या पार्श्वभूमीवर गंगा स्‍नान आटोपून एकाच कुटुंबातील १७ जण एका बोटीतून गंगा नदी पार करून जात होते. त्‍यावेळी १७ जण बोट उलटल्‍याने पाण्यात पडले. यावेळी स्‍थानिक नागरिकांच्या मदतीने रेस्‍क्‍यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. ज्‍यामध्ये जवळपास १३ लोकांना वाचवण्यात यश आले. मात्र ४ लोक अद्यापही बेपत्‍ता आहेत. पटण्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीमना घटनेची सूचना देण्यात आली आहे. त्‍याचबरोबर घटनास्‍थळी स्‍थानिक प्रशासनाची टीम देखील पोहोचलेली आहे.

या बोटीतील सर्व लोक हे एकाच कुटुंबातील असून नालंदा जिल्‍ह्‍यातील मालती गावचे रहिवासी आहेत. बोट उलटल्‍यानंतर स्‍थानिक नागरिकांनी यातील १३ लोकांना वाचवले. मात्र अजुनही ४ लोक बेपत्‍ता आहेत. बचावकार्य सुरू आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news