Asaduddin Owaisi : ओवैसी यांच्या घरावर शाई फेक

ओवैसी यांच्या घरावर शाई फेक
black ink Throw on Owaisi's house
खासदार ओवैसी यांच्या दिल्लीतील अशोका रोडवरील घरावर काल रात्री अज्ञातांनी काळी शाई फेक केली. Owaisi File Photo

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : एआयएमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या दिल्लीतील अशोका रोडवरील घरावर गुरुवारी (दि. 27) रात्री अज्ञातांनी काळी शाई फेक केली. त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणारे आणि ‘भारत माता की जय’ लिहिलेले पोस्टर चिकटवून त्यांच्या निवासस्थानाची तोडफोड केल्याचा आरोप ओवैसी यांनी केला आहे.

खासदारांची सुरक्षा अशीच करणार आहात का?

दिल्ली पोलिसांसमक्ष अशा गोष्टी होणे ही शरमेची बाब आहे. गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला अशाच प्रकारे खासदारांची सुरक्षा करणार आहेत का?, असा सवाल त्यांनी एक्सवर केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news