पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले भाजपचे सक्रीय सदस्य

भाजपच्या सक्रिय सदस्यत्व अभियानाला आजपासून सुरुवात
Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपचे सक्रिय सदस्यत्व घेतले.Pudhari photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा भाजपने आजपासून (बुधवार दि.१६) सक्रिय सदस्यत्व अभियान सुरू केले आहे. य़ाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिले सक्रीय सदस्यत्व घेत या अभियानाची सुरूवात केली. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, राष्ट्रीय सरचिटणीस आणि सदस्यता अभियान प्रमुख विनोद तावडे यावेळी उपस्थित होते. या अभियानामुळे सक्रिय सदस्यत्व घेणाऱ्यांना विशेष महत्त्व दिले जाणार आहे.

हे अभियान सुरू करताना पंतप्रधान मोदी सोशल मीडियावर म्हणाले की, विकसित भारत निर्माण करण्याच्या प्रयत्नांना आम्ही गती देत आहोत. आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत प्रथम सक्रिय सदस्य बनण्याचा आणि सक्रिय सदस्यत्व अभियान सुरू केल्याचा अभिमान वाटतो. ही अशी चळवळ आहे जी तळागळात आमचा पक्ष आणखी मजबूत करेल आणि राष्ट्रीय प्रगतीसाठी आमच्या पक्ष कार्यकर्त्यांचे प्रभावी योगदान सुनिश्चित करेल.

Narendra Modi
Narendra Modi | कितीही आरडाओरड करा; २०२९ मध्येही मोदीच!

पंतप्रधान मोदी म्हणाले की, सक्रिय सदस्य होण्यासाठी एका कार्यकर्त्याला एका बूथवर किंवा विधानसभा क्षेत्रात ५० सदस्यांची नोंदणी करावी लागेल. असे कार्यकर्ते मंडळ समिती आणि त्यावरील निवडणूक लढविण्यास पात्र असतील. त्याचबरोबर आगामी काळात पक्षासाठी काम करण्याच्या अनेक संधी त्यांना मिळतील.

भाजपने सदस्यत्व मोहिमेच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना पक्षात सामावून घेण्याची मोहीम सुरू केली आहे. आजपासून सुरू झालेली ही मोहीम ३१ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या अंतर्गत जो पक्ष कार्यकर्ता ५० किंवा त्याहून अधिक लोकांना पक्षात सामील करून घेईल, त्याला पक्ष सक्रिय सदस्य बनवेल. सक्रिय सदस्य होण्यासाठी कोणत्याही कार्यकर्ता किंवा नेत्याला सक्रिय सदस्यता अर्ज भरावा लागेल आणि नमो ॲपवर १०० रुपये सदस्यता शुल्कही भरावे लागेल.

दरम्यान, भाजपची प्राथमिक सदस्यत्व मोहीम काल १५ ऑक्टोबर रोजी पूर्ण झाली असून आजपासून सक्रिय सदस्यत्व मोहीम सुरू झाली आहे. यासाठी तीन दिवसीय कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत केवळ ऑनलाइनच नव्हे तर ऑफलाइनही फॉर्म भरून लोकांना सदस्यत्व दिले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news