दिल्लीमध्ये भाजप रमेश बिधुडींना मुख्यमंत्री करणार

Delhi Assembly Election | अरविंद केजरीवाल यांचा दावा
Delhi Assembly Elections schedule
Delhi Assembly Elections : प्रातिनिधिक छायाचित्र. File Photo
Published on
Updated on

नवी दिल्लीः दिल्लीमध्ये भाजप मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, सत्ताधारी आम आदमी पक्षाने भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहराच घोषित करुन टाकला आहे. ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी याविषयी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, भाजप निवडणूक समितीच्या बैठकीत रमेश बिधुडी यांना दिल्लीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मी रमेश बिधुडी यांचे अभिनंदन करतो.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, मला ही बातमी सूत्रांकडून मिळाली आहे. यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अतिशी यांनीही हा दावा केला होता. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेच्या वतीने रमेश बिधुडी यांना प्रश्न विचारले. ते म्हणाले की, रमेश बिधुडी यांनी सांगावे की खासदार म्हणून १० वर्षात त्यांनी दिल्लीच्या लोकांसाठी काय काम केले? दिल्लीसाठी त्यांचा काय दृष्टिकोन आहे? ते दिल्लीसाठी आणखी काय करतील? जेव्हा त्यांची नावे औपचारिकपणे जाहीर केली जाईल. तेव्हा ‘आप’ आणि भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारांमध्ये जाहीर चर्चा झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news