

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे नेते आणि लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना शहरी नक्षलवाद्यांनी घेरले आहे. आता ते काँग्रेसच्या विचाराचे कमी अति-डाव्या विचारसरणीचे झाले आहेत. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाइम्स ऑफ इंडिया दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहेत. तसेच भारतीय संविधानाची प्रत पारंपारिक निळ्या रंगातील कव्हरमध्ये असते. मात्र राहुल गांधी भारतीय संविधानाची प्रत लाल रंगातीलच कव्हर घातलेलीच का दाखवतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. याची माहिती आता महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या 'एक्स' हँडलवरदेखील प्रसिद्ध करत राहुल गांधीच्यावर टिकास्र सोडले आहे.