दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची २९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Delhi Assembly Election | केजरीवालांविरुद्ध प्रवेश सिंह वर्मा यांना तर मुख्यमंत्री अतिशींविरुद्ध रमेश बिधूडी यांना उमेदवारी
Delhi Assembly Election
दिल्ली विधानसभा निवडणूकfile photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने २९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध माजी खासदार प्रवेश सिंह वर्मा यांना तर मुख्यमंत्री अतिशी यांच्याविरुद्ध कालकाजीमधून रमेश बिधूडी यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि त्यानंतर भाजपवासी झालेले अरविंदर सिंह लवली तसेच आम आदमी पक्षाच्या सरकारमधील माजी मंत्री आणि पुढे भाजपमध्ये गेलेले कैलास गेहलोत यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत केवळ २ महिला उमेदवारांना स्थान देण्यात आले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी सर्व राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. यात आम आदमी पक्षाने तर आधीच आपले सर्वच्या सर्व उमेदवार जाहीर केले आहेत.

नवी दिल्ली विधानसभेतील लढत लक्षवेधी

दिल्ली विधानसभा निवडणूकीत आम आदमी पक्षाने नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल यांना उमेदवारी जाहीर केली. केजरीवालांच्या विरुद्ध काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख विरोधी पक्षांनी दोन माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध उभे केले आहेत. काँग्रेसने माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांना तर भाजपने दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचे पुत्र प्रवेश सिंह वर्मा यांना उमेदवारी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news