भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती पुन्हा बिघडली, रुग्णालयात दाखल

भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
BJP leader LK Advani
लालकृष्‍ण अडवाणी यांची प्रकृती बिघडल्यामुळे अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. बुधवारी (दि.3) रात्री त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अडवाणी यांना मथुरा रोडवरील अपोलो हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात नेण्यात आले आहे. नुकतेच अडवाणी यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपोलो हॉस्पिटलने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना डॉ. विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली रात्री 9 वाजता अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ते निरीक्षणाखाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

BJP leader LK Advani
बँकेची कर्ज वसुलीसाठी अनोखी युक्ती; भाजप नेत्याच्या दारात वाजविले डफडे

लालकृष्ण अडवाणी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान आहेत. 96 वर्षीय अडवाणी यांना अलीकडेच नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले होते, त्यानंतर त्यांना 27 जून रोजी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला होता. 26 जून रोजी रात्री 10.30 च्या सुमारास अडवाणी यांना एम्समध्ये दाखल करण्यात आल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. त्यांच्यावर युरोलॉजी विभागात उपचार सुरू होते. डॉ. अमलेश सेठ यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते आणि ते निरीक्षणाखाली होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news