दिल्ली निवडणुकीबाबत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक

Delhi Assembly Election | दुसरी यादी आज येण्याची शक्यता
Delhi Assembly Election
दिल्ली विधानसभा निवडणूकfile photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक शुक्रवारी रात्री पार पडली. तत्पुर्वी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी सकाळी पार पडली.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. या बैठकीत दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांबाबत चर्चा झाली. या बैठकीनंतर शनिवारी भाजपची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. ७० सदस्यीय दिल्ली विधानसभेत यापुर्वी भाजपने २९ उमेदवार जाहीर केले आहेत.

मीनाक्षी लेखी दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार?

माजी केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राहू शकतात. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. या पार्श्वभूमीवर भाजप त्यांना दिल्ली विधानसभेत उतरवून मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हणून पुढे केले जाऊ शकते. मीनाक्षी लेखी नवी दिल्लीतून खासदार होत्या, त्यामुळे त्यांना दिल्लीची चांगली माहिती देखील आहे.

पंतप्रधान मोदींकडून पत्रकारांची विचारपूस 

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी पंतप्रधान मोदी भाजप मुख्यालयात दाखल झाले होते. यावेळी मुख्यालयात दाखल झाल्यानंतर थेट बैठक सभागृहाकडे जाण्यापूर्वी ते तिथे असलेल्या पत्रकारांकडे गेले. त्यांनी पत्रकारांची विचारपूस केली आणि कडाक्याच्या थंडीत काळजी घ्या, असेही सांगितले. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थित पत्रकारांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या आणि पुढे बैठकीसाठी निघाले. पंतप्रधान मोदींच्या या अनपेक्षित कृतीने उपस्थित पत्रकार मात्र भारावून गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news