

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने विविध राज्यांतील उमेदवारांची यादी आज (दि.२०) जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
आसाममधून मिशन रंजन दास, रामेश्वर तेली, बिहारमधून मनन कुमार मिश्र, हरियाणामधून श्रीमती किरण चौधरी, मध्यप्रदेशातून जॉर्ज कुरियन, ओडिशातून ममता मोहंता, राजस्थानातून सरदार रवनीत सिंह बट्टू, त्रिपुरा राजीव भट्टाचार्य यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.