दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे सर्व उमेदवार जाहीर, २ जागा मित्रपक्षाला सोडल्या

Delhi Assembly Election | ९ उमेदवारांसह अंतिम यादी जाहीर
Delhi Assembly Election
दिल्ली विधानसभा निवडणूक Pudhari File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ९ उमेदवारांसह चौथी यादी जाहीर केली. ७० सदस्यीय दिल्ली विधानसभेसाठी भाजपने आतापर्यंत ६८ उमेदवार जाहीर केले आहेत. चौथ्या यादीत ग्रेटर कैलासमधून आप उमेदवार आणि दिल्ली सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज यांच्या विरोधात भाजपने शिखा राय यांना उमेदवारी दिली आहे. तर दिल्ली आपचे प्रदेशाध्यक्ष आणि बाबरपूरचे उमेदवार गोपाल राय यांच्या विरोधात अनिल वशिष्ठ यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, ७० पैकी उर्वरित २ जागा एनडीएमध्ये मित्रपक्ष असलेल्या जदयुला भाजपने सोडल्याचे समजते. पुर्वांचलमधील मतदारांना आपल्याकडे वळवणे तसेच मित्रपक्षांना खुश ठेवणे अशा दोन्ही गोष्टी याद्वारे साध्य करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे.

स्मृती इराणी, मीनाक्षी लेखी निवडणुकीच्या रिंगणात नाही

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक मागील शुक्रवारी पार पडली. त्यानंतर ५ दिवस उलटूनही भाजपने यादी जाहीर केली नव्हती. त्यामुळे पक्ष काही नावांवर विशेष विचार करत आहे आणि त्यांना दिल्ली विधानसभेत उमेदवारी देईल, अशी चर्चा होती. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि मीनाक्षी लेखी यांचा समावेश होता. मात्र भाजपने आता आपले सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे हे स्पष्ट झाले की स्मृती इराणी किंवा मीनाक्षी लेखी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून नसणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news