

Bihar Snake Woman बिहारच्या वाल्मिकीनगर व्याघ्र प्रकल्पाच्या जवळच्या एका गावात एका रेस्क्य ऑपरेशनचा व्हिडीओ समाज माध्यामातून चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक महिला एका १२ फूटी अतिजहाल व किंग कोब्राला सहजपणे हाताळताना दिसत आहे. एका घरात आलेला हा किंगक्रोब्रा पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडणाऱ्या महिला आहेत बिहारच्या स्नेक वूमन जानकी देवी
भल्याभल्यांना फूटतो घाम
साधा साप दिसला तरी अनेकांना घाम फूटतो. पण जानकी देवी यांचे धाडस पाहून अनेकांना आर्श्चयाचा धक्का बसतो. आता त्यांनी पकडलेला किंग कोब्रा पाहून अनेक जण त्यांच्या धाडसाचचे कौतुक करत आहेत. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की बिहारमधील एका निवासी भागात अचानक तब्बल10 फूट लांबीचा अवाढव्य किंग कोब्रा आढळून आला. एवढ्या मोठ्या सापाला पाहून स्थानिक नागरिकांची एकच तारांबळ उडाली आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच, परिसरात 'स्नेक वूमन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या जानकी देवी तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या त्यांनी सहजपणे या कोब्राल पकडून जंगलात सोडून दिले.
किंग कोब्राचे वेटोळे जानकीदेवींच्या शरीराला
हा विषारी साप मुन्नी लाल नावाच्या व्यक्तीच्या घरात शिरला होता. कोब्रा दिसताच कुटुंबातील सदस्यांनी घराबाहेर धाव घेतली आणि शेजाऱ्यांना याची कल्पना दिली. घरात तो महाकाय साप असतानाच, काही मिनिटांतच घराबाहेर लोकांची मोठी गर्दी जमली. याची माहिती मिळताच, वाल्मिकीनगरच्या 'स्नेक लेडी' (सापांची बाई) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि प्रशिक्षित सर्पमित्र असलेल्या जानकी देवी घटनास्थळी पोहोचल्या. अनेक वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी सुमारे १० फूट लांबीच्या किंग कोब्राला अत्यंत काळजीपूर्वक पकडले. यानंतर त्यांच्या अंगाला सापाने वेटोळे घातल्याचे दिसत आहेत त्या सापाचे तोंड त्यांनी हातात दाबून धरले आहे. व अगदी सहज चालत त्या किंग कोब्राला घेऊन जाताना दिसत आहेत. त्यानंतर त्यांनी सुरक्षितपणे जवळच्या जंगलात सापाला सोडून दिले.
वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पाच्या आसपासच्या गावांना सापांचा धोका
वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पातील वनरक्षक सत्यम कुमार यांनी सांगितले की, पावसाळ्यात आणि हवामान बदलत असताना अशा घटना अधिक घडतात; कारण या काळात साप कोरड्या आणि सुरक्षित आश्रयाच्या शोधात आपली नैसर्गिक अधिवास-स्थळे सोडून बाहेर पडतात. वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पाच्या (Valmiki Tiger Reserve) लगतच्या गावांमध्ये अशा घटनांचा धोका विशेषतः जास्त असतो. अशावेळी ग्रामस्थांना घाबरून न जाण्याचे किंवा स्वतःहून साप पकडण्याचा प्रयत्न न करण्याचे आवाहन केले.
कोण आहेत ‘स्नेक वूमन’ जानकी देवी
जानकी देवी या वन्यजीव बचाव कार्यासाठी त्या भागात एक परिचित व्यक्तिमत्त्व बनल्या आहेत. त्यांना बिहारच्या स्नेक वूमन अशीही ओळख तयार केली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, त्यांनी गेल्या काही वर्षांत हजारो विषारी सापांना सुरक्षितपणे वाचवले आहे. त्यांनी वयाच्या १२ व्या वर्षी सापांना वाचवण्याचे काम सुरू केले आणि बचाव कार्य करताना त्यांना स्वतःलाही अनेकदा सापाने दंश केला आहे. इतके धोके असूनही, त्या घाबरलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी धावून जाण्याचे काम अविरतपणे करत आहेत आणि याद्वारे लोक व वन्यजीव या दोघांचेही संरक्षण करण्यास मदत करत आहेत.