Bihar Elections Results 2025 : बिहारमध्‍ये भाजप सर्वात मोठा पक्ष, जेडीयू पिछाडीवर; मुख्यमंत्री कोण होणार?

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंहांनी मुख्‍यमंत्रीपदाबाबत भाजपची भूमिका केली स्‍पष्‍ट
Bihar Elections Results 2025
प्रातिनिधिक छायाचित्र.File Photo
Published on
Updated on

Bihar Elections Results 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीच्‍या निकालामध्‍ये रालोआची वाटचाल स्‍पष्‍ट बहुमताकडे झाली आहे. ताज्या ट्रेंडनुसार, राज्‍यात पुन्‍हा एकदा रालोआचे सरकार स्‍थापन होणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे आणि एनडीएने बहुमताचा आकडा सहज ओलांडला आहे. आता भाजप हा राज्‍यात सर्वात मोठा पक्ष झाल्‍यास मुख्‍यमंत्री पदावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अशातच केंद्रीय मंत्री गिरीराज सिंहांनी मुख्‍यमंत्रीपदाबाबत भाजपची भूमिका स्‍पष्‍ट केली आहे.

मतमोजणीची ताजी आकडेवारी काय सांगते?

निवडणूक आकडेवारीनुसार, दुपारी १२ वाजेपर्यंत, भाजप ८६ , जेडीयू ७८ , आरजेडी ३१ , एलजेपी रामविलास २१ , सीपीआयएमएल ६ आणि काँग्रेस ५ जागांसह आघाडीवर आहेत. एकूण २३८ जागांसाठी कल समोर आले आहेत, तर अधिकृत विजय अद्याप जाहीर झालेला नाही. तथापि, सध्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते की एनडीए पुन्हा सत्ता स्‍थापन करणार आहे. अंतिम निकाल जसजसे येतील तसतसे बिहारचे राजकीय चित्र स्पष्ट होईल.

Bihar Elections Results 2025
Nitish Kumar : बिहारचे 'किंग' नितीशकुमारच, जाणून घ्‍या 'अजातशत्रू' नेत्‍याचे यंदाच्‍या निवडणुकीतील 'सत्ताकारण'

नितीश कुमारच होणार मुख्‍यमंत्री

आजच्या तरुणांनी पूर्वीच्या कुशासनाचे काळ पाहिलेले नसले तरी त्‍यांच्‍या वडिलांनी नसतील 'जंगल राज' पाहिले आहे. बिहार भ्रष्ट नेत्यांच्या हाती सोपवला जाणार नाही, असा विश्‍वास व्‍यक्‍त करत बिहारमधील सरकारच्‍या नेतृत्त्‍व आणि मुख्यमंत्री पदाबद्दलच्या गोंधळाची गरज नाही. राज्‍यात नितीश कुमारांच्‍या नेतृत्वाखालीच सरकार स्‍थापन होईल, असे बिहारमधील बेगुसरायचे खासदार आणि केंद्रीय गृहमंत्री गिरीराज सिंह यांनी 'इंडिया टुडे'शी बोलताना स्‍पष्‍ट केले आहे.

Bihar Elections Results 2025
Bihar Election Results: बिहारमध्ये NDA बहुमताच्या जवळ; तेजस्वी आणि महाआघाडीचं काय झालं? कोणाला किती जागा मिळाल्या?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news