

भोपाळ : मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिवाळीचा आनंद फटाके फोडून घेतला जात असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेक मुलांनी मोठ्या आवाजासाठी पिव्हीसही पाईपचा वापर करुन बनवलेल्या कार्बाइडचा गनचा वापर केला. याचा परिणाम म्हणजे 14 ते 15 मुलांना आपली दृष्टी गमवावी लागण्याची शक्यता आहे.
त्यांच्यावर भोपाळमधील अनेक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच अनेकांना या गनच्या वापरामुळे भाजण्यासारख्या घटनाही घडल्याचे समोर येत आहे. ही गन अगदी 150 ते 200 रुपयाला बाजारात सहज उपलब्ध होते. तसेच कॅल्शियम कार्बाइडही सहज हार्डवेअरमध्ये उपलब्ध होते. तसेच विविध रुग्णालयात 122 अशाप्रकारच्या रुग्णांची नोंद झाली आहे. 19 ते 21 ऑक्टोंबर या दिवाळीच्या दिवसांमध्ये या केसेस नोंद झाल्या आहेत. पिटीआय या वृत्तसंस्थेच्या मते अशा प्रकारच्या 60 केसेस नोंद झाल्या आहेत. यामध्ये 8 ते 14 वर्षाखालील मुलांचे प्रमाण अधिक आहे.
काय आहे कार्बाईड गन
मध्य प्रदेशाच्या विविध भागात घरगुती पद्धतीने बनवलेल्या सहजरित्या उपलब्ध असलेल्या कार्बाईड गन (calcium carbide gun) चा अनेकांनी फटाक्यासारखा आवाज करण्यासाठी वापर केला. दोन पिव्हीसी पाईपचे तुकडे एक लाईटर याचा वापर करुन ही गन तयार केली जाते. यामध्ये कॅल्शियम कार्बाइडचे तुकडे घातले जातात व त्यावर पाणी टाकले की एक विषिष्ट गॅस तयार होतो. या गॅसवर दाब आणाला की त्याचा जोरात स्फोट होतो व मोठा आवाज होतो. स्थानिक वृत्तांनुसार अनेक जण जखमी झाले असून काही रुग्णांना दृष्टी गमावावी लागल्याची तक्रार समोर आली आहे.
कार्बाईड आणि पाणी मिसळून तयार होणाऱ्या या स्फोटात पाईपचे तुकडे आणि प्लास्टिकचे कण चेहरे व डोळ्यात घुसतात. परिणामी कॉर्निया आणि इतर डोळ्याचे अवयव गंभीरपणे जखमी होतात आणि अनेकवेळा दृष्टी जाण्याचा धोका असतो.
भोपाळमधील रुग्णालयांचे डॉक्टर सांगतात की स्फोटानंतर अनेकांच्या डोळ्यात प्लास्टिकचे कण घुसल्याने कॉर्नियाला मार लागला त्यामुळे 14 ते 15 मुलांना दृष्टी गमवावी लागली. तसेच 100 च्या वर अशा प्रकारच्या केसेस डोळयांच्या दवाखाण्यात नोंद झाल्या आहेत. यामध्ये 20 ते 30 टक्के रुग्णांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करणे गरजेचे बनले आहे. तसेच अनेकांना चेहरा व हातापयांना भाजले आहे. त्यांच्यावर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
भोपाळच्या गांधी मेडिकल कॉलेजमधील नेत्ररोग तज्ञ डॉ एस एस कुबरे व डॉ आदिती दुबे यांना इंमर्जेंसी ड्युटीवर तैनात केले आहे. व अशा कसेसेवर लक्ष ठेवण्यासाठी नेमले आहे. तसेच पुढे घटना घडू नये म्हणून प्रशासनाने अशा गन जप्त करण्यास सुरवात केली आहे.