Bhabhi Attacks Sister In Law: भावजयचे हे कसले सरप्राईज.... नणंद बाईंच्या डोळ्यावर बांधली पट्टी अन्...

या घटनेत नणंन गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
Bhabhi Attacks Sister In Law
Bhabhi Attacks Sister In Lawpudhari phoro
Published on
Updated on
Summary
  • घरात प्रिया अन् पूजा दोघीच होत्या

  • डोळे बांधले, रूममध्ये नेलं बेडवर बसवलं अन्...

  • आवाज ऐकून शेजारचे आले धावून

  • पोलिसांनी पूजाला घेतलं ताब्यात

Crime News Bhabhi Attacks Sister In Law: नणंद भावजय या नात्याला एक काळिमा फासणारी घटना घडली आहे. भावजयेनं आपल्या नंदेला वाढदिवसाचं चांगलंच गिफ्ट दिलं आहे. तिला गिफ्ट देण्याच्या बहाण्यानं डोळे बांधून मारहाण करण्यात आली. स्वयंपाक घरातील तव्याने तिच्या डोक्यावर ५० वार करण्यात आले आहेत. या घटनेत नणंन गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

घरात प्रिया अन् पूजा दोघीच होत्या?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'राधानगरमधील रहिवासी गिरीश अग्रवाल हे रिक्षा चालवतात. त्यांचे गिरीश यांचा मुलगा शिवांशू याचे एका वर्षापूर्वी कचरहरी घाट इथं राहणाऱ्या पूजा यांच्यासोबत प्रेम विवाह झाला होता. विवाहानंतर पूजा गिरीश यांच्या मालकीच्या घरात राहण्यासाठी आल्या.

कुटुंबात गिरीश यांची पत्नी संगिता अग्रवाल, प्रिया अग्रवाल आणि छोटा मुलगा आलोक एकत्रच रहातात. दरम्यान, ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी गिरीश अग्रवाल सकाळी रिक्षा काढून आपल्या कामावर गेले होते. शिवांशू आणि त्यांची आई संगिता नातेवाईकांकडे गेले होते. तर छोडा मुलगा कोचिंग क्लासला गेला होता. घरात केवळ प्रिया अग्रवाल आणि तिची भावजय पूजा या दोघीच होत्या.

डोळे बांधले, रूममध्ये नेलं बेडवर बसवलं अन्...

मिळालेल्या माहितीनुसार सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पूजाने प्रियासोबत बोलत होती. त्यावेळी तिनं एक जानेवारीला तिचा वाढदिवस असून तिनं एका खास सप्राईज गिफ्ट मागवलं आहे असं सांगितलं. पूजाने गिफ्ट हे सरप्राईज स्वरूपाज देण्यासाठी प्रियाला रूममध्ये येण्यास सांगितलं. रूममध्ये आल्यावर पूजाने आधी प्रियाच्या डोळ्यावर पट्टी बांधली. त्यानंतर तिचे हात देखील बांधले.

त्यानंतर पूजाने प्रियाला बेडवर बसवलं. तिनं अचानक प्रियाच्या डोक्यात टोकदार वस्तूने मारहाण करण्यास सुरूवात केली. हा हल्ला करण्यासाठी चाकू, तवा किंवा चिमटा या सारख्या गोष्टींचा वापर केला गेला. पीडित प्रियाच्या म्हणण्यानुसार पूजाने तिच्या डोक्यावर ५० पेक्षा जास्त वार केले. ती सतत ओरडत होती आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र तिचे हात बांधले असल्यानं तिला काही करता आलं नाही.

आवाज ऐकून शेजारचे आले धावून

प्रियाने स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत रूमच्या बाहेर आली. मात्र डोक्यातून खूप रक्तस्त्राव झाल्यामुळं ती खाली पडली. तिने आरडा ओरडा केल्यानंतर लोक एकत्र झाले. शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला तर आता प्रिया रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यांनी त्वरित कुटुंबियांना याची माहिती दिली.

याचबरोबर शेजाऱ्यांनी पोलिसांना देखील या घटनेची माहिती दिली. प्रियाची आई संगिता यांनी सांगितले की, ज्यावेळी त्या घरात आल्या त्यावेळी रूममध्ये रक्त अन् सामान पडले होतं. घरातल्या वस्तूंवर रक्ताचे डाग होते. जखमी अवस्थेत असलेल्या प्रियाने घडलेल्या घटनेची सर्व माहिती दिली. प्रियाला गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

पोलिसांनी पूजाला घेतलं ताब्यात

दरम्यान, पोलिसांच्या चौकशीदरम्यान पूजाने पोलिसांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तिने घरात एक अज्ञात युवक घुसला होता. त्याने हल्ला केला असं सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र मिळालेले पुरावे आणि जखमी प्रियाच्या वक्तव्यानंतर पोलिसांना पूजाच्या दाव्यावर संशय आला.

पोलिस अधिकाऱ्यांनी पीडित मुलीकडून अजून पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आलेली नाही. त्यामुळं एफआयआर दाखल झालेली नाही. तक्रार मिलाल्यानंतर उचित नियमांनुसार गुन्हा नोंद केला जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.

मात्र या घटनेनंतर स्थानिकांमध्ये चर्चाला ऊत आला आहे. एकाच घरात राहणाऱ्या लोकांमध्ये अशा प्रकारची हिंसा झाल्याने गावकरी देखील हैराण झाले आहेत. पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक अँगलने तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news