Bengaluru News: गोदामात चार कामगारांचा मृत्यू

शेडमध्ये झोपेतच मृत्यू ः पोलिस तपास सुरू
Crime Death News
Crime Death NewsPudhari
Published on
Updated on

बंगळूर : होस्कोटे तालुक्यातील मुत्संद्रा गावात शनिवारी सकाळी झोपेत असताना चार मजुरांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. जयंत शिंदे (वय 25), नीरेंद्रनाथ (वय 24), दातर तिडे (वय 25) आणि धनंजय तिडे (वय 20) अशी मृतांची नावे आहेत.

चारही कामगार गोदामात काम करत होते. त्यांना गोदामाजवळ बांधलेल्या शेडमध्ये राहण्याची परवानगी देण्यात आली होती. नेहमीप्रमाणे शुक्रवारी काम संपवून त्यांनी स्वयंपाक केला आणि जेवण झाल्यावर ते चौघेही बाहेर गेले होते. परतल्यानंतर ते शेडच्या खिडक्या आणि दरवाजे पूर्णपणे बंद करून झोपी गेले. शनिवारी ते मृतावस्थेत आढळले. झोपल्यानंतर गॅस गळतीमुळे गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. सकाळी जेव्हा इतर शेडमधील कामगार त्यांना कामावर बोलावण्यासाठी आले तेव्हा त्यांना झोपलेल्या स्थितीत चौघे मृत असल्याचे आढळले. सुलिबेले पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.

कोका कोला कंपनीने काय सांगितले?

संबंधित गोदाम हे कोकाकोला कंपनीचे असल्याचे प्राथमिक वृत्त होते. यावर कंपनीने अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. 'मृत कर्मचारी व ही घटना घडली ते गोदाम हे कोकाकोला कंपनीशी संबंधित नाही. गोदाम आणि तेथील कर्मचारी हे सोना प्रोडक्टिव्ह पीपल या कंपनीशी संबंधित असून कोकाकोलाचा याच्याशी संबंध नाही', असे कंपनीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news