

Shocking Incident in Bengaluru: बंगळुरूमध्ये एका शाळेत एक गंभीर प्रकार घडला. सातवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षकांनी त्याला शिक्षा केली म्हणून आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेतील किरकोळ घटनेवरून या विद्यार्थ्याने हे टोकाचं पाऊल उचललं. ही घटना मंगळवारी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या बहिणीला याबाबत माहिती दिली होती.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार विद्यार्थ्याने गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार मुलाला शाळेतील शिक्षकांनी इतर विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन केल्याबद्दल वर्गातून बाहेर काढलं होतं. पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासात ही घटना वर्गातील एक किरकोळ घटना असल्याचं दिसत आहे असं सांगितलं.
मात्र असं असलं तरी पोलीस या प्रकरणाचा खोलात जाऊन तपास करत आहेत. मुलाचा छळ होत होता किंवा त्याला शाळेत कोणती मोठी शारीरिक शिक्षा केली होती का. त्याने हे टोकाचं पाऊल उचलण्यामागं कोणती परिस्थिती निर्माण झाली होती याचा तपास करत आहेत.
पोलिसांनी सांगितलं की अजून तरी पालकांकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. पालकच अजून धक्क्यातून सावरलेले नाहीत. त्यांना देखील समुपदेशन देण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढचा तपास असून सुरू आहे.