Bramati By-election | बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी 

पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात लढत होणार
Bramati By-election
Bramati By-election
Published on
Updated on

नवी दिल्ली: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने ॲड. आकाश मोरे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आता बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार विरुद्ध काँग्रेसचे आकाश मोरे असा सामना होण्याची शक्यता आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली. या पार्श्वभूमीवर लागलेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर केली. 

Bramati By-election
Baramati Rahuri by-election : पोटनिवडणुकीत काँग्रेसची एंट्री; बारामती-राहुरीत रंगणार सामना

सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेला काँग्रेसचा खो! 

बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील त्यांचा पक्ष पोट निवडणूक लढवणार नाही, महाविकास आघाडी म्हणून देखील आम्ही ही निवडणूक लढवू नये, असा प्रस्ताव मित्र पक्षांसमोर मांडू, असे वक्तव्य केले होते. मात्र सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याला महाविकास आघाडीतील प्रमुख मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने खो दिल्याचे स्पष्ट झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news