Bangalore News: धक्कादायक! व्याजाचे पैसे थकल्याने महिलेचे कपडे उतरवले, व्हिडिओही बनवला अन्...; ४ जणांना बेड्या

कर्जाचे व्याज वेळेवर न दिल्याने एका महिलेचा विवस्त्र करून छळ करण्यात आल्याची अत्यंत संतापजनक घटना बेंगळूरमध्ये समोर आली आहे.
Crime News
Crime Newsfile photo
Published on
Updated on

Bangalore News

बेंगळूर: कर्जाचे व्याज वेळेवर न दिल्याने एका महिलेचा विवस्त्र करून छळ करण्यात आल्याची अत्यंत संतापजनक घटना बेंगळूरमध्ये समोर आली आहे. आरोपींनी महिलेचे कपडे उतरवून तिचा व्हिडिओ बनवला आणि तो इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकीही दिली. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चारही आरोपींना अटक केली आहे.

दरमहा ५ हजार रुपये व्याजाची अट

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्मा, नजरत, सुहेल आणि सैफ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित महिलेने दोन वर्षांपूर्वी रेश्माकडून १ लाख रुपये उसने घेतले होते. यासाठी तिला दरमहा ५ हजार रुपये व्याज द्यावे लागत होते. याशिवाय रेश्माची मैत्रीण नजरत हिच्याकडूनही पीडितेला ५० हजार रुपये देण्यात आले होते. गेल्या चार आठवड्यांपासून कौटुंबिक अडचणींमुळे पीडित महिला व्याजाची रक्कम देऊ शकली नव्हती. पुढील महिन्यात सर्व पैसे देईन, असे तिने रेश्माला सांगितले होते.

Crime News
Crime News : फोटोग्राफरच्‍या मृत्यूनंतरही प्रेयसीला येत राहिले २० दिवस मेसेज; एका बॅगने उघड केलं भयंकर सत्‍य!

वारंवार धमक्या आणि छळ

रेश्मा सतत फोन करून धमकावत असल्याने पीडितेने तिचा नंबर ब्लॉक केला. अपमान आणि छळाच्या भीतीपोटी ती दुसऱ्या ठिकाणी भाड्याच्या घरात राहू लागली. यानंतर नजरतचा फोन येऊ लागला. पैसे नसल्याने तिच्याकडे घरकाम करण्यास तयार असल्याचे पीडितेने सांगितले आणि ती नजरतच्या घरी काम करू लागली.

महिलेचे कपडे उतरवले

नजरतच्या घरी काम करत असताना सुहेल हा तिच्यावर जबरदस्ती करत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. त्यानंतर एका दिवशी नजरत, रेश्मा, सुहेल आणि सैफ या चौघांनी पीडितेला जबरदस्तीने रिक्षात बसवून बेंगळूरच्या वेशीवरील कांबळगोडू परिसरात नेले. तिथे त्यांनी महिलेचे कपडे उतरवून तिला बेदम मारहाण केली. आरोपींनी लैंगिक छळ करत या कृत्याचा व्हिडिओ बनवला आणि तो इंटरनेटवर पसरवण्याची धमकी दिली.

त्यानंतर मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शोध घेऊन पीडितेची सुटका केली आणि चारही आरोपींना बेड्या ठोकल्या.

Crime News
Crime News: बिर्याणी खाल्ल्याची इतकी भयंकर शिक्षा? ११ वीतल्या मुलीने संपवलं आयुष्य; शाळेत असं काय घडलं?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news