बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्याकडून आदरांजली अर्पण

Balasaheb Thackeray | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्‍सवर पोस्‍ट करत व्यक्‍त केल्‍या भावना
Balasaheb Thackeray
शिवसेनाप्रमुख दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली: शिवसेनाप्रमुख दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदरांजली अर्पण केली. पंतप्रधान मोदी एक्सवर भावना व्यक्त करताना म्हणाले की, 'लोककल्याण आणि महाराष्ट्राच्या विकासाप्रती बाळासाहेब ठाकरे यांच्या बांधिलकीबद्दल त्यांचे सर्वत्र स्मरण केले जाते. त्यांनी कधीही त्यांच्या मूळ तत्वांशी तडजोड केली नाही आणि भारतीय संस्कृतीचा गौरव वाढवण्यासाठी त्यांनी नेहमी योगदान दिले,' असेही पंतप्रधानांनी नमूद केले आहे.

तर 'सनातन संस्कृती आणि राष्ट्रीयत्व या विचारधारेला आजन्म समर्पित बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या कार्यातून राष्ट्रप्रेमाला नेहमी प्राधान्य दिले. प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या तत्वाशी कधीही तडजोड न करणाऱ्या बाळासाहेबांची वैचारिक कटिबद्धता सदैव प्रेरणा देत राहील. प्रखर राष्ट्रवादी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम,' अशा आशयाची पोस्ट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली अर्पण केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news