इंडियन मेडिकल असोसिएशनच्या दणक्यानंतर बाबा रामदेवांच्या पतंजलीची ‘सारवासारव’! 

Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : योगगुरू रामदेव बाबा यांच्या अ‍ॅलोपॅथीविरोधातील वक्तव्यावर इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) तीव्र नाराजी व्यक्त करत नोटीस धाडली होती. आयएमएने योगगुरू रामदेव बाबा यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे. रामदेव बाबा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ज्यामध्ये ते अ‍ॅलोपॅथीविरूद्ध बोलत आहेत. 

अधिक वाचा : सुवेन्दू अधिकारी यांच्या वडिलांना वाय प्लस सुरक्षा

इंडियन मेडिकल असोसिएशनने कायदेशीर नोटीस धाडल्यानंतर बाबा रामदेव यांच्या पतंजलीने सारवासारव केली आहे. हरिद्वार येथील पतंजली योगपीठ ट्रस्टने एक निवेदन जारी केले आहे की रामदेव अशा साथीच्या कठीण परिस्थितीत दिवसरात्र काम करणार्‍या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांचा "अत्यंत आदर" करतात. पुढे म्हटले आहे की, त्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर मिळालेला एक फॉरवर्ड मेसेज कार्यक्रमात वाचत होते. 

अधिक वाचा : 'दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ ठेवा, म्हणजे सगळेच प्रश्न सुटतील'

पतंजली योगपीठ ट्रस्टचे सरचिटणीस आचार्य बालकृष्ण यांनी स्वाक्षरी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, आधुनिक विज्ञान आणि आधुनिक वैद्यकीय अभ्यासाद्वारे औषधोपचार करणार्‍यांविरोधात स्वामींचा कोणताही चुकीचा हेतू नाही." त्यांच्यावर जे काही आरोप केले जात आहेत ते चुकीचे आणि निरर्थक आहेत.

अधिक वाचा : योगगुरू रामदेव बाबांवर गुन्हा दाखल करा : IMA

शनिवारी याच संदर्भात मेडिकल असोसिएशनने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले. ज्यात आरोग्यमंत्र्यांनी रामदेव बाबा यांचा आरोप मान्य करावा. तसेच आधुनिक आरोग्य सुविधा रद्द कराव्यात. नसेल तर यांच्यावर महामारी रोग अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करावा. तसेच त्यांच्यावर खटला चालविला जावा, असं म्हटले आहे.

अधिक वाचा : दुसर्‍या लाटेत सर्वाधिक मृत्यू मेमध्ये

तसेच रामदेव बाबा यांच्यावर कारवाई न केल्यास आयएमएला त्यांवर कायदेशीर कारवाई करावी लागेल असा इशारा ही आयएमएने आपल्या निवेदनात दिला होता. या निवेदनात, बाबा रामदेव हे आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित असे योग गुरू आहेत. तसेच ते एका औषधी कंपनीशी संबंधितही आहेत. तर लोकांची दिशाभूल करण्यासाठी ते आपल्या औषध कंपनीच्या उत्पादनांविषयी खोटे बोलताना पाहिले गेले आहे. सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेल्या त्या व्हीडिओमध्ये रामदेव बाबा हे अ‍ॅलोपॅथीला 'एक स्टुपीड' आणि 'दिवाळखोर विज्ञान' म्हणून संबोधत आहेत. ते त्यात म्हणतात की, अ‍ॅलोपॅथी हे एक मूर्ख आणि दिवाळखोर विज्ञान आहे. 

 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news