ज्येष्ठांसाठी 'आयुष्मान भारत वय वंदना कार्ड योजना', जाणून घ्या अर्ज कसा करावा ?

Ayushman Bharat Vay Vandana | ज्येष्ठांना ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत
Ayushman Bharat Vay Vandana Card
ज्येष्ठ व्यक्तिंसाठी 'आयुष्मान भारत वय वंदना कार्ड योजना', जाणून घ्या कसा करता येईल अर्ज? File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ७० किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान भारत वय वंदना कार्ड देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. ज्येष्ठांसाठी बहुप्रतिक्षित आयुष्मान भारत आरोग्य विमा सुरू करण्याची घोषणादेखील सरकारने केली. या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांना ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळविण्यासाठी जाणून घ्या नोंदणी कशी करावी?.

आधार कार्डमध्ये नोंदवलेल्या वयानुसार ज्येष्ठ व्यक्तीचे वय ७० वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे, असा पात्रतेचा एकमेव निकष आहे. पात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी नावनोंदणी आणि आयुष्मान कार्ड जारी करण्यासाठी आधार-आधारित ई-केवायसी अनिवार्य आहे. आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (AB PMJAY) नावनोंदणीसाठी आधार हे एकमेव कागदपत्र आहे.

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक उत्पन्न गटातील सर्व लोकांना आरोग्य विमा संरक्षण दिले जाईल. यासाठी पात्र लोकांना पीएम जनआयोग योजना https://beneficiary.nha.gov.in/ च्या अधिकृत वेबसाइटवर किंवा आयुष्मान ॲपच्या मदतीने अर्ज करता येईल.

'आयुष्मान वय वंदना कार्ड' असे मिळेल मोफत 

  • राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण https://beneficiary.nha.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर.

नॅशनल हेल्थ अथॉरिटी (NHA) वेबसाइटवरून रजिस्ट्रेशन करा

पायरी 1: आयुष्मान ॲप डाउनलोड करा

पायरी 2: लाभार्थी म्हणून लॉगिन वर क्लिक करा

पायरी 3: तुमची सर्व माहिती प्रविष्ट करा आणि प्रमाणीकरण मोड निवडा आणि पुन्हा प्रविष्ट करा’ आणि लॉगिन क्लिक करा.

पायरी 3: लाभार्थी तपशील, आधार तपशील प्रविष्ट करा

पायरी 4: लाभार्थी न आढळल्यास, eKYC साठी प्रक्रियेचे अनुसरण करा. OTP साठी संमती द्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news