'शरयू'काठी दीपोत्सव : तब्बल 25 लाख दिव्यांनी उजळणार 'अयोध्यानगरी'

28 दीपोत्सवाची सलग सातव्यांदा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार नोंद, अयोध्येत होणार तब्बल 25 लाख दिव्यांचे दीपप्रज्वलन
Ayodhya Divostav
अयोध्येत होणार तब्बल 25 लाख दिव्यांचे दीपप्रज्वलनUP Tourism
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्येमध्ये यावर्षी 500 वर्षांनंतर दिवाळी साजरी होत आहे. हा एक ऐतिहासिक सोहळा असणार आहे. कारण, रामलल्ला यांच्या अभिषेकनंतर पहिल्यांदाच नवीन राम मंदिरात दिवाळी साजरी होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

25 लाख दिव्यांनी परिसर खुलणार

अयोध्या घाट आज (दि.30) 25 लाख दिव्यांनी सजवण्यात येणार असून, त्यामुळे शहराचे सौदर्य अधिकच खुलणार आहे.याघटनेची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये केली जाणार आहे. गेल्या सहा वर्षांपासून अयोध्येत दीपोत्सवादरम्यान किती दिवे लावले जातात, याची नोंद केली जात आहे. यावेळी 25 लाख दिवे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, यासाठी स्थानिक कारागिरांकडून आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून कोणताही दिवा खराब झाला तरी उद्दिष्ट गाठता येईल.

पर्यावरणपूरक फटाक्यांची होणार अतिषबाजी

आज होणाऱ्या दीपोत्सवामध्ये अयोध्येत पर्यावरणपूरक फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे. हे फटाके 120 ते 600 फूट उंचीवर आकाशात उडणार आहेत. तसेच परिसरातील 5 किमीच्या अंतरावरून ते पाहता येणार आहेत. शरयू ब्रिजवर संध्याकाळी फटाक्यांसह लेझर शो, फ्लेम शो आणि संगीत कार्यक्रमाचेही आयोजन केले जाणार आहे.

10 हजार सुरक्षाकर्मचारी तैनात

दिवाळी निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाची सुरक्षा लक्षात घेता, अयोध्येत सुमारे 10,000 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. राममंदिराकडे जाणारे सर्व रस्ते लोकांसाठी बंद करण्यात आले असून केवळ पासधारकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. सुव्यवस्था राखण्यासाठी या मार्गांवर पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. अयोध्या परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार म्हणाले की, सुरक्षा व्यवस्था सुरळीत करण्यासाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news