पुढारी ऑनलाईन डेस्क : नंदीग्राममध्ये अयोध्यासारखे भव्य राम मंदिर बांधले जाईल आणि त्याची पायाभरणी ६ एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी केली जाईल, अशी घोषणा पश्चिम बंगालाचे भाजपचे ज्येष्ठ नेते शुभेंदू अधिकारी यांनी केली. पूर्व मेदिनीपूरमध्ये ते बोलत होते. ( Nandigram Ram temple )
यावेळी शुभेंदू अधिकारी म्हणाले की, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अधिकारी म्हणाले की, मवारी त्यांच्या गृहजिल्हा पूर्व मेदिनीपूरमध्ये सोनाचुरा येथे पायाभरणी समारंभाच्या आधी भांगबेरा ते सोनाचुरा अशी भव्य मिरवणूक काढली जाईल . यामध्ये सर्व दुर्गा पूजा आणि स्थानिक मंदिर समित्यांचे प्रतिनिधी, हिंदू धार्मिक संघटना आणि सामुदायिक क्लब सहभागी होतील.
नंदीग्राममधील राम मंदिर हे पश्चिम बंगालमधील सर्वात मोठे राम मंदिर असेल. हे राज्यातील कोट्यवधी हिंदूंच्या भगवान राम यांच्यावरील भक्तीचे प्रतिबिंब असेल. नंदीग्राममध्ये आधीच शतकानुशतके जुने राम मंदिर आहे. स्थानिक आमदार म्हणून अधिकारी यांनी प्रथम तृणमूल काँग्रेसच्या काळात आणि आता भाजपच्या काळात त्याचे नूतनीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्याच जिल्ह्यातील दिघा येथे राज्य सरकारने जगन्नाथ मंदिर बांधण्याचे काम सुरू केल्यामुळे नवीन राम मंदिर बांधण्याच्या हालचालीला महत्त्व प्राप्त झाले आहे. ( Nandigram Ram temple )
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले आहे की, जगन्नाथ मंदिराचे उद्घाटन यावर्षी ३० एप्रिल रोजी येणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी होईल. शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर भगवान जगन्नाथाच्या भक्तांच्या भावनांशी खेळण्याचा आरोप केला होता. ओडिशातील पुरी येथे आधीच शतकानुशतके जुने जगन्नाथ मंदिर आहे. दरवर्षी पश्चिम बंगालसह देशभरातून लाखो भाविक या मंदिराला भेट देतात. रामनवमीला पश्चिम बंगालमध्ये १ कोटी हिंदू रस्त्यावर उतरतील. २००० पर्यंत मिरवणुका काढल्या जातील, अशी घोषणाही अधिकाऱ्यांनी केली होती.
ज्या जमिनीवर राम मंदिर बांधले जाणार आहे ती जमीन तृणमूलकडे असताना मूळ मालकांनी अधिकारी यांना कवडीमोल किमतीत विकली होती, असा आराेप तृणमूलचे राज्य सरचिटणीस कुणाल घोष यांनी मंगळवारी आरोप केला. २००७ मध्ये जमीन अधिग्रहण विरोधी आंदोलनादरम्यान नंदीग्राममध्ये पोलिसांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या १४ जणांच्या स्मरणार्थ रुग्णालय बांधण्यासाठी ही जमीन खरेदी केली होती.