

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरात ऐन रामनवमीच्या मुहूर्तावर रामलल्लाच्या कपाळावर ‘सूर्यतिलक’ उमटल्याचा अत्यंत अद्वितीय आणि पवित्र क्षण हजारो भाविकांनी अनुभवला. दुपारी बरोबर बारा वाजता सूर्यकिरणांचे एक लक्षित आणि अचूक किरण रामलल्लाच्या मूर्तीच्या कपाळावर पडले, त्यामुळे एक दिव्य तिलक तयार झाला. यावेळी पूजार्यांनी रामलल्लाची विशेष पूजा केली.
अयोध्येत मोठ्या प्रमाणावर भाविक जमले होते. हा सूर्यतिलक सोहळा पाहताच प्रभू रामचंद्राचा जयजयकार केला. ‘याची देही, याची डोळा’ हा अनुपम सोहळा पाहिल्याचे समाधान सार्या भाविकांच्या चेहर्यावर उमटले. अयोध्येचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक राजकरण नायर यांनी सांगितले की, रामनवमीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात भाविक अयोध्येत येत आहेत. आम्ही परिसर झोनमध्ये विभागले आहेत आणि ड्रोनद्वारे सुरक्षा आणि गर्दी नियंत्रण केले जात आहे.