

थिरूअनंतपुरम : एका दलित पीडितेवर पाच वर्षांत ६४ जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची खळबजनक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीनंतर आतापर्यंत १५ नराधमांना अटक केली आहे.
दलित पीडिता ही धावपटू आहे. १३ व्या वर्षापासून आतापर्यंत ६४ जणांनी बलात्कार केल्याची फिर्याद पीडितेने दिली आहे. सध्या पीडितेचे वय अठरा असून तिच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत. नराधमांमध्ये कोच, प्रशिक्षक, सहकारी खेळाडूंसह अन्य आरोपींचा समावेश आहे. पीडितेच्या वडिलांच्या मोबाईलवरून संशयितांशी संपर्क केला जात आहे. त्यामध्ये ४० जणांची ओळख पटली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पीडित मुलगी अल्पवयीन असल्यापासून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून पोक्सोअंतर्गत नराधमांवर गुन्हे दाखल करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.