भारताकडे आता हवाई ‘अस्त्र’

स्वदेशी बनावटीच्या एअर-टू-एअर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
Astra missile test
भारताकडे आता हवाई ‘अस्त्र’
Published on
Updated on

भुवनेश्वर : भारताने स्वदेशी शस्त्र प्रणाली विकसित करण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल टाकत, ‘अस्त्र’ या बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर-टू-एअर मिसाईलचे यशस्वी चाचणी प्रक्षेपण केले आहे. ही चाचणी ओडिशाच्या किनारपट्टीवर ‘एलसीए तेजस एएफ एमके 1’ प्रोटोटाईप लढाऊ विमानावरून करण्यात आली.

संरक्षण दलातील सूत्रांच्या मते, एरॉनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीने चांदीपूर किनार्‍यावरून हे चाचणी प्रक्षेपण पूर्ण केले. चाचणीमध्ये क्षेपणास्त्राने एका हलत्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला. या चाचणीमध्ये ‘अस्त्र’च्या सर्व उपप्रणालींनी अचूक कार्य केले आणि मिशनची सर्व उद्दिष्टे पूर्ण झाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘डीआरडीओ’, भारतीय वायुदल, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि या चाचणीमध्ये सहभागी असलेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ही चाचणी यशस्वी झाल्याने ‘एलसीए तेजस एएफ एमके 1’मध्ये ‘अस्त्र’ मिसाईल समाविष्ट करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील काही महिन्यांत अधिक चाचण्या घेण्यात येणार आहेत.

‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये

‘डीआरडीओ’ने विकसित केलेले ‘अस्त्र’ 100 कि.मी.हून अधिक श्रेणीतील लक्ष्य भेदू शकते. यात प्रगत मार्गदर्शन आणि नेव्हिगेशन प्रणाली आहे, जी अधिक अचूकतेने लक्ष्य नष्ट करू शकते. भारतीय वायुदलाने ‘अस्त्र’ला आधीच स्वीकारले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news