Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता

Ashok Kharat Case: Ujjwal Nikam Likely to Be Appointed as Special Public Prosecutor
Published on
Updated on

नवी दिल्ली : नाशिकमधील बहुचर्चित भोंदू खरात प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून शुक्रवारी आवश्यक पूर्तता केल्यानंतर शासनाकडून अधिकृत आदेश जारी केला जाऊ शकतो, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

भोंदू खरात प्रकरणाच्या तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सरकारकडून विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याबाबत विचार सुरू होता. त्यासाठी उज्ज्वल निकम यांच्या नावाला प्राधान्य देण्यात आल्याचे समजते.

सूत्रांच्या माहितीनुसार, नियुक्तीबाबतची प्रशासकीय कार्यवाही जवळपास पूर्ण झाली असून शुक्रवारी यासंदर्भातील औपचारिकता पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर शासन निर्णय जारी करून नियुक्तीची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. यासंदर्भात अद्याप अधिकृत शासकीय आदेश जारी झालेला नसून शासनाकडून अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news