...तर मी दिल्ली निवडणुकीत मोदींचा प्रचार करेन - केजरीवाल

Arvind Kejriwal On PM Modi| पंतप्रधान मोदी पुढील वर्षी 17 सप्टेंबर रोजी होणार निवृत्त
Arvind Kejriwal On PM Modi
अरविंद केजरीवाल यांची पंतप्रधान मोदींवर टिकाPudhari Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली: आम आदमी पार्टीने (आप) रविवारी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये 'जनता की अदालत' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यादरम्यान आपचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपले भाषण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील वाढदिवसाला 'निवृत्त' होतील, असा दावा केजरीवाल यांनी येथे केला.

भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत केजरीवाल म्हणाले, '22 राज्यांमध्ये त्यांची सरकारे आहेत. तुम्ही त्यांना एका राज्याचे नाव सांगा जिथे त्यांनी वीज मोफत दिली आहे. ते 30 वर्षांपासून गुजरातमध्ये सत्तेत आहेत. त्यांनी एकाही शाळेची दुरुस्ती केली नाही. 22 राज्यांत त्यांची सरकारे आहेत. एक गोष्ट सांगा की, त्यांनी चांगले काम केले आहे. पंतप्रधान मोदी पुढील वर्षी 17 सप्टेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. मी तुम्हाला आव्हान देतो की, "या एका वर्षात 22 राज्यांमध्ये दिल्लीत जे काही घडले आहे तेच दाखवावे". 10 वर्षात त्यांनी काहीही केले नाही.

...तर मी मोदिंचा प्रचार करेन-केजरीवाल

केजरीवाल पुढे म्हणाले, 'जेव्हा तुम्ही निवृत्त व्हाल तेव्हा सर्वांना वाटेल की तुम्ही 10 वर्षे काहीही केले नाही, पण 11व्या वर्षी काहीतरी केले. आज मी पंतप्रधान मोदींना सांगतो की, दिल्लीच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये आहेत. फेब्रुवारीपूर्वी या 22 राज्यांमध्ये वीज मोफत करा, मी दिल्ली निवडणुकीत मोदींचा प्रचार करेन.

७५ वर्षे ओलांडलेल्या नेत्यांना 'मार्गदर्शक मंडळा'मध्ये स्थान

पुढच्या वर्षी म्हणजे 17 सप्टेंबर 2025 रोजी पंतप्रधान 75 वर्षांचे होतील. केजरीवाल यांचे हे विधान महत्त्वाचे आहे. कारण भाजपने अलीकडेच सक्रिय राजकारणापासून ७५ वर्षे ओलांडलेल्या नेत्यांना वेगळे करून 'मार्गदर्शक मंडळा'मध्ये स्थान दिले होते, ज्यात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, नजमा हेपतुल्ला यांसारख्या नावांचा समावेश आहे.

केजरीवाल 'फ्री रेवडी' देतात,भाजपचा आरोप

याआधी आपल्या भाषणात ते म्हणाले की, हे लोक (भाजप) म्हणतात की केजरीवाल 'फ्री रेवडी' देतात. रेवडी पाऊच दाखवत केजरीवाल म्हणाले, आज माझ्याकडे रेवडी मोफत आहे. त्यात 7 रेवड्या आहेत. येथून निघाल्यावर रेवडीचे पाकीट मिळेल. केजरीवालांच्या 6 मोफत रेवडी, मोफत वीज, मोफत पाणी, वृद्धांसाठी तीर्थयात्रा, महिलांसाठी मोफत बस प्रवास, मोफत जागतिक दर्जाचे शिक्षण, मोफत औषध आणि उपचार. केजरीवाल यांची सातवी मोफत रेवडी, महिलांच्या खात्यात 1000 रुपये जातील. ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की, दिल्लीतील जनतेचे प्रेम, पाठिंबा आणि विश्वास माझ्या प्रामाणिकपणाचा पुरावा ठरेल. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, डबल इंजिनचे सरकार म्हणजे दुहेरी लूट. यूपीमध्ये गेल्या सात वर्षांपासून दुहेरी इंजिनचे सरकार आहे, पण ते अपयशी ठरले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news