नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील न्यायालयात आर्टिफिशियल इंटेलिजन्सने (Artificial Intelligence) प्रवेश केला आहे. शनिवारी (दि.20) दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात पहिली पायलट हायब्रीड कोर्ट रुम सुरु करण्यात आली. दिल्ली उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश मनमोहन यांनी स्पीच टू टेक्स्ट फॅसिलिटीच्या आधारवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स पायलट हायब्रीड कोर्ट रूमचे उद्घाटन केले.
Delhi court technology, AI implementation Delhi, AI news, Delhi judicial system
न्यायमूर्ती मनमोहन यांच्या हस्ते डिजिटल कोर्ट अॅपचाही शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना न्यायमूर्ती मनमोहन म्हणाले की, न्यायप्रणाली सुधारण्यासाठी आणि न्याय वितरणातील विलंब कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. एआयमुळे न्यायालयाचे काम सोपे होणार आहे. न्यायाधीश जेव्हा एखाद्या खटल्याचा निर्णय देतील तेव्हा तो निर्णय एआय डिक्टेशनद्वारे रेकॉर्ड करेल आणि टाईप केला जाईल. यामुळे वेळेची बचत होईल, तसेच न्यायाधीश आणि न्यायालयीन कर्मचा-यांची, विशेष करून टायपिस्ट यांची कार्यक्षमता वाढण्याची शक्यता आहे. (Artificial Intelligence)