'नीट' प्रकरणातील 'मास्टरमाईंड' गजाआड; सीबीआयची मोठी कारवाई

मुख्य आरोपींला झारखंड येथील धनबादमधून अटक
NEET Paper Leak
नीट-यूजी पेपरफुटीचा घोटाळाFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : युजीसी-नीट परीक्षेतील गोंधळाप्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई समोर आली आहे. सीबीआयने या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला झारखंड येथील धनबाद येथून अटक केली आहे.

झारखंडमध्ये युजीसी-नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई समोर आली आहे. सीबीआयने बुधवारी (दि.3) धनबाद येथून 'नीट' पेपरलीक प्रकरणातील कथित सहकारी अमन सिंगला अटक केली आहे. युजीसी-नीट गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासासंदर्भात केंद्रीय अन्वेषण ब्युरोने केलेली ही सातवी अटक आहे. प्रथम सीबीआयने पेपर लीकमध्ये संबधित असलेल्या झारखंड मॉड्यूलबद्दल गुप्त माहिती गोळा केली, त्यानंतर सिंगला अटक केली आहे.

NEET Paper Leak
Dhule News | नीट परीक्षा पेपर फुटीतील घोटाळेबाजांवर कडक कारवाई करावी

सीबीआयने शनिवारी (दि. 29) जून झारखंडमधील हजारीबाग येथून एका हिंदी मीडिया संस्थेचे मार्केटिंग व्यावसायिक जमालुद्दीन अन्सांरी याला अटक केली होती. या अटकेच्या एक दिवस आधी एजन्सीने ओएसिस स्कूलचे मुख्याध्यापक एहसानुल हक आणि उपप्राचार्य इम्तियाज आलम यांना अटक केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news