Arranged marriage : 'आपण डिजिटल युगात जगतो, लग्‍न ठरवताना केवळ...."

तरुणीने 'सोशल मीडिया'वर मांडले स्‍वअनुभवातील 'वास्‍तव' : ॲरेज मॅरेजमध्‍ये तरुणींनी कोणती सावधगिरी बाळगावी याबाबत दिला सल्‍ला
Arranged marriage in 2025
प्रातिनिधिक छायाचित्र. File Photo
Published on
Updated on

Arranged marriage in 2025 | "कुटुंबीयांनी निश्‍चित केलेल्‍या व्‍यक्‍तीसोबत लग्‍न करताना तुम्‍ही केवळ नोकरी कुटुंबाची प्रतिष्ठा पाहून निर्णय घेऊ नका. कारण एखादी प्रतिष्‍ठीत व्‍यक्‍तीही धोकादायक असू शकते. याचा अनुभव मी घेतला आहे. शहाणा व्‍हा. स्वतःचा मानसिक जपा. मनात शंका वाटली, तर ती दुर्लक्षित करू नका", अशा शब्‍दांमध्‍ये एका तरुणीने सोशल मीडियावर स्‍वअनुभव मांडला आहे. तसेच ॲरेज मॅरेजमध्‍ये तरुणींनी कोणती सावधगिरी बाळगावी हेही तिने सांगितले आहे.

तरुणीने सोशल मीडिया फ्‍लॅटफॉर्म रेडिटवरील ‘Arranged Marriage in 2025: Why Girls Need to Do a Full Digital Background Check (My Story)’ असा मथळा असणार्‍या पोस्टमध्ये आपला तिला आलेला अनुभव मांडला आहे. तिने या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, मी २२ वर्षांची तरुणी आहे. काही दिवसांपूर्वी मी रेडिटवर एक पोस्ट केली होती, जिथे मी एका अरेंज मॅरेजमध्ये जबरदस्तीने अडकवले जात असल्याची माहिती शेअर केली. या प्रक्रियेत कुणीही माझं मत विचारत नव्हतं. त्यावर एका अनोळखी व्यक्तीने मला थेट संदेश पाठवून सांगितलं की, ‘शांत राहा आणि वास्तववादी विचार कर. आपण डिजिटल युगात जगतो, त्यामुळं त्या व्यक्तीचा ऑनलाइन इतिहास तपास.’

Arranged marriage in 2025
Premarital Counseling | देशातील पहिले प्री मॅरेज कौन्सिलिंग सेंटर नाशिकमध्ये

'प्रतिष्ठित' समजले जाणारे काही पुरुष...

ज्‍याच्‍याबरोबर माझं लग्‍न निश्‍चित झालं होते त्‍याची डिजिटल प्रोफाईल तपासण्‍यास ुरुवात केली. समोर आलं ते धक्कादायक होतं. ते पाहून लक्षात आलं की समाजात "प्रतिष्ठित" समजले जाणारे काही पुरुष प्रत्यक्षात किती असुरक्षित आणि संशयास्पद असू शकतात. माझा अनुभव इतर मुलींना सावधगिरी बाळगण्यासाठी उपयोगी पडावा, यासाठी ही पोस्‍ट करत आहे. तो व्यक्ती वरवर बघता सुशिक्षित आणि प्रतिष्ठित नोकरी करणारा होता. पण खाजगी संवादांमध्ये? तो अत्यंत बेदरकार, भावनिकदृष्ट्या अस्थिर, परस्पर संमतीचा अवमान करणारा, स्वत:च्या त्रासदायक सवयींना गौरव देणारा आणि संभाषणांवर नियंत्रण ठेवण्याचा अट्टहास करणारा निघाला, असेही तिने पोस्‍टमध्‍ये नमूद केले आहे.

Arranged marriage in 2025
वर पळाला, वधूने २० किलोमीटर पाठलाग करुन मांडवात आणला..! एका ‘लव्‍ह मॅरेज’ची गोष्‍ट…

वास्‍तव अधिक अस्‍वस्‍थ करणारे...

माझं ज्‍याच्‍याशी लग्‍न ठरलं होतं त्‍याच्‍याबरोबर मी माझ्या मैत्रिणीच्या नावाने सोशल मीडियावर संपर्क साधला. यानंतर जे काही समोर आलं, ते अधिकच अस्वस्थ करणारं होतं. त्याने मला अश्लील छायाचित्रे पाठवली. तसेच ‘हे काही विशेष नाही’ असे म्‍हणत आपल्‍या कृतीचे समर्थनही केले. हे सर्व सामान्य असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला. त्याचं वागणं धोकादायक आणि विषारी होतं. तो डिजिटल फ्‍लॅटफॉर्मवर वेगळाच होता आणि प्रत्‍यक्षात त्‍याचे वागणे वेगळे होते, असेही तिने पोस्‍टमध्‍ये म्‍हटले आहे.

Arranged marriage in 2025
ना शारीरिक संबंध ना प्रेम…! जपानमध्ये लग्नाचा नवा ट्रेंड, जाणून घ्या काय आहे ‘फ्रेंडशिप मॅरेज’?

अनुभवातून मिळालेले महत्त्‍वाचे धडे...

फक्त नोकरीचं पद किंवा कुटुंबाची प्रतिष्ठा ही व्यक्तीच्या चारित्र्याची हमी देत नाही. व्‍यक्‍ती डिजिटल फ्‍लॅटफॉर्मवर कसा आहे, हे पाहणे महत्त्वाचा ठरते. लिंक्डइन प्रोफाइल, जुने इन्स्टाग्राम कमेंट्स, रेडिटवरील पोस्ट्स – या सर्व गोष्टी त्या व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी उघड करतात. इतरांशी त्यांचं वागणंसुद्धा खूप काही सांगतं.भावनिक छळ हा काही जणांसाठी 'सामान्य' असतो. गिल्ट ट्रिप, धक्कादायक कबुल्या यांचा वापर करून ते आपलं नियंत्रण प्रस्थापित करू पाहतात.पहिल्या काही संभाषणांतच त्या व्यक्तीबद्दल बरंच काही समजतं, केवळ बायोडाटावर विसंबू नये, असा सल्‍लाही तरुणींना दिला आहे.

Arranged marriage in 2025
लव्‍ह स्‍टोरी की ‘हेरगिरी’? सीमा हैदरची आज पुन्‍हा होणार चौकशी

काही महत्त्‍वाच्‍या सूचना...

तरुणीने स्‍वअनुभवानंतर तरुणींना काही सूचना केला आहेत त्‍या पुढील प्रमाणे : लग्‍न ठरविताना संबंधित तरुणाचा सोशल मीडिया प्रोफाइल मागा. त्यांचे गुगल सर्च करा. आवश्यक असल्यास, एखाद्या तटस्थ किंवा बनावट प्रोफाइलमधून संवाद साधा–त्यांच्या वर्तनाची चाचणी घ्या. प्रारंभीच कठीण प्रश्न विचारा. त्यांच्या प्रतिक्रियांमध्येच सत्य लपलेलं असतं. प्रश्न विचारायला अजिबात संकोच करू नका. कारण हा आयुष्यभराचा निर्णय असतो. आज मी ठीक आहे. मी त्या व्यक्तीला सर्वत्र ब्लॉक केलं आहे आणि कुटुंबीयांनाही सगळं सांगितलं. पण प्रत्येक मुलीला असं पाठबळ मिळेलच असं नाही. म्हणूनच हा अनुभव इतरांसाठी शेअर करते आहे.सावध राहा. चौकस राहा. शांततेची किंमत जपा, असा सल्‍लाही तरुणीने आपल्‍या पोस्‍टमधून दिला आहे.

Arranged marriage in 2025
"देवाची कृपा, माझं लग्‍न झालेले नाही" : बागेश्‍वर बाबा असं का म्‍हणाले?

"हे केवळ तरुणींपुरते मर्यादित नसावे"

ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली असून, यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरनेम्‍हटलं की "सोशल मीडिया पोस्ट्स किंवा कमेंट्स पुरेशा नसतात. एखादा फ्रीलान्स सायबर सुरक्षा तज्ज्ञ नियुक्त करा, तो यापेक्षा खूप अधिक माहिती शोधून काढू शकतो." एका युझरने मत व्यक्त केले की, "ही प्रक्रिया केवळ मुलींपुरती मर्यादित ठेवू नये. माझ्या मते, सर्वांनीच सखोल पार्श्वभूमी तपासणी करावी. हे सर्वांसाठीच आवश्यक आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news