लेबनॉनमधील 'पेजर' स्‍फाेट इस्‍त्रायलचा 'मास्‍टरस्‍ट्रोक' : लष्‍कर प्रमुख उपेंद्र व्‍दिवेदी

तुम्ही नियोजन सुरू करता तेव्‍हाच युद्ध सुरू होते
Army Chief General Upendra Dwivedi
भारताचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी.File photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : "इराण समर्थित हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेविरोधात लेबनॉनमध्‍ये पेजरच्‍या माध्‍यमातून स्‍फोट घडवणे हा इस्‍त्रायलचा मास्‍टरस्‍ट्रोक होता. या कारवाईसाठी इस्रायलची वर्षानुवर्षे तयारी आवश्यक आहे, असे मत लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी व्‍यक्‍त केले. ते चाणक्य सुरक्षा चर्चासत्रामध्‍ये बोलत होते.

नियोजन सुरू करता तेव्‍हा खर्‍या अर्थाने युद्ध सुरू झालेले असते...

नुकतेच लेबनॉनमध्ये पेजर आणि वॉकी-टॉकीजच्या स्फोटांमध्ये हिजबुल्लाहाचे ४० दहशतवादी ठार झाले हाेते. तर 3,000 हून अधिक जखमी झाले हाेते. याबाबत बोलताना लष्‍कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले की, "तुम्ही लढायला सुरुवात कराल त्या दिवशी युद्ध सुरू होत नाही, तर जेव्हा तुम्ही नियोजन सुरू करता तेव्‍हा खर्‍या अर्थाने युद्ध सुरू झालेले असते. इस्रायलने आता आपले लष्करी लक्ष गाझा पट्टीवरून लेबनॉनच्या उत्तरेकडील सीमेवर हलवले आहे. तिथे त्‍यांनी हिजबुल्लाहला लक्ष्य केले आहे."

हमासनंतर हिजबुल्लाहचा खात्‍मा करण्‍याचे इस्रायलचे लक्ष्‍य

"इस्रायलने काहीतरी वेगळे केले आहे. इस्रायलने ठरवले होते की, हमास हे त्यांचे प्राथमिक लक्ष्य आहे. इस्रायलने प्रथम हमासचा खात्‍मा केला. यानंतर दुसऱ्या बाजूला हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेवर लक्ष केंद्रित केले. पेजर्ससाठी तयार केलेली शेल कंपनी एक मास्टरस्ट्रोक होता." असेही लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितले.

लेबनाॅनमधील पेजर स्‍फाेटाने जगभरात उडाली हाेती खळबळ

स्काय न्यूज अरेबियाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले होते की, इस्रायली गुप्तचर संस्था मोसादने डिव्हायसेसच्या बॅटरीवर PETN ही अत्यंत स्फोटक वस्तू ठेवली होती. परिणामी बॅटरीचे तापमान वाढल्याने त्यांचा स्फोट झाला. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पेजरचा मॉडेल क्रमांक AP924 असा होता. प्रत्येक पेजरमध्ये बॅटरीजवळ एक ते दोन स्फोटक जोडली होती. लेबनॉनमध्ये दुपारी साडेतीन वाजता या पेजर्सवर एक मेसेज आला. त्यानंतर पेजरमध्ये बसवलेली स्फोटक सक्रिय झाली होती. लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह सदस्यांच्या पेजर आणि वॉकी-टॉकीजच्या अनेक स्फोटांमध्ये सुमारे ४० दहशतवादी ठार झाले होते. तर तीन हजारहून अधिक जखमी झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news