

पुढारी ऑनलाईन डेस्कः "आम्ही येथे यात्रेकरु म्हणून येतो आम्ही जे काम करतो. एखादे प्रकरण निकालाचा परिणाम सकारात्मक असू शकते किंवा काही निकालाचे परिणाम नकारात्मकही असू शकतात. कालच मी विचार केला की, आता निवृत्तीचा क्षण जवळ आला आहे." असे स्पष्ट करत माझ्या कार्यकाळात अनावधानाने मी कोणाला दुखावले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दांमध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड ( Dhananjaya Chandrachud) यांनी निवृत्तीपूर्वी आपले मनोगत मांडले.
यावेळी धनंजय चंद्रचूड म्हणाले की, "मी जेव्हा तरुण वकील होतो त्यावेळी न्यायालयातील युक्तिवाद व कोर्टरुमधील क्लृप्ती यांचा बारकाईने अभ्यास केला. माझ्या न्यायदान क्षेत्रातील या प्रवासात न्यायालयातील प्रत्येक घटकाची साथ मला लाभली, मला माझ्या कारकीर्दीतील कायद्याबरोबर जीवनानेही बरेच काही शिकवले. आता मी सरन्यायाधीश पदावरुन निवृत्त होत आहे. माझ्यानंतर भावी सरन्यायाधीश संजीव खन्ना हे या पदाचा वारसा जपतील."