

कोटा: जेईई अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याने कोटामध्ये जीवन संपवले आहे. कोटा येथील शिकवणीमध्ये त्याने प्रवेश घेतला होता. गुरुवारी (दि.४ जुलै) राहत्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. संदीपकुमार कुमार असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.
राजस्थानची एज्युकेशन सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थी गेल्या दोन वर्षांपासून कोटा येथे राहून जेईईची तयारी करत होता आणि त्याचे हे दुसरे वर्ष होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याने रात्री उशिरा आपल्या खोलीत गळफास लावून घेतला. आज सकाळी कोचिंगसाठी जात असताना खोलीत राहणाऱ्या विद्यार्थ्याला त्याच्या खोलीच्या आकाशकंदीलमध्ये दोरी लटकलेली दिसली आणि त्यांनी घरमालकाला माहिती दिली. विद्यार्थी संदीप हा मूळचा बिहारमधील नालंदा येथील रहिवासी होता. पोलिसांनी मृतदेह शवागारात ठेवला आहे.
जेईई कोचिंगसाठी प्रसिद्ध असलेले कोटा शहराबद्दल बोलायचे झाले तर, लाखो विद्यार्थी आपले भविष्य घडवण्यासाठी येथे येतात. मात्र गेल्या काही वर्षांत ज्या प्रकारे विद्यार्थी जीवन संपवत आहेत. याची अनेक कारणे समोर येत आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांच्या जीवन संपवण्याच्या घटनेमागे अभ्यासाचा मानसिक ताण हे कारण समोर आले आहे. या वर्षभरातील जानेवारीपासून आतापर्यंत एकूण १३ विद्यार्थ्यांनी जीवन संपवले आहे. ज्यामध्ये बीटेकच्या एका विद्यार्थ्याचाही समावेश आहे.