Anil Ambani assets seized : अनिल अंबानींची आणखी १४०० कोटींची मालमत्ता 'ईडी'कडून जप्‍त

मनी लाँड्रिंग प्रकरणाच्‍या चौकशीत कारवाई, आतापर्यंत सुमारे ९ हजार कोटींची मालमत्ता जप्‍त
Anil Ambani assets seized : अनिल अंबानींची आणखी १४०० कोटींची मालमत्ता 'ईडी'कडून जप्‍त
Published on
Updated on

Anil Ambani assets seized : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) उद्योगपतीअनिल अंबानी आणि त्यांच्या कंपन्यांची १,४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची नवीन मालमत्ता जप्‍त केली आहे. मनी लाँड्रिंग चौकशी प्रकरणी ही कारवाई करण्‍यात आली आहे. यामुळे या प्रकरणात जप्त केलेल्या मालमत्तेचे एकूण मूल्य सुमारे ९,००० कोटी रुपयांवर पोहोचले असल्‍याचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.

'ईडी' चौकशी कशामुळे झाली?

रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स या कंपन्‍यांनी सार्वजनिक निधी इतरत्र वळल्‍याचा आरोप आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, येस बँकेने २०१७ ते २०१९ दरम्यान, 'आरएचएफएल'मध्ये २,९६५ कोटी रुपये आणि 'आयएफसीएल'मध्ये २,०४५ कोटी रुपये गुंतवले. नंतर ही गुंतवणूक निष्क्रिय झाली. डिसेंबर २०१९ पर्यंत 'आरएचएफएल'साठी १,३५३.५० कोटी रुपये आणि 'आयएफसीएल'कडून१,९८४ कोटी रुपये थकित रहिले.

Anil Ambani assets seized : अनिल अंबानींची आणखी १४०० कोटींची मालमत्ता 'ईडी'कडून जप्‍त
Bank Fraud Case | अनिल अंबानी यांच्याविरुद्ध एफआयआर; 'RCOM'शी संबंधित मुंबईतील ठिकाणांवर CBI चे छापे

यापूर्वी ईडीकडून ३,०८४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्‍त

नोव्‍हंबर महिन्याच्या सुरुवातीला, ईडीने अंबानींशी संबंधित सुमारे ३,०८४ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर तात्पुरती जप्ती केली होती. यामध्ये मुंबईतील एक निवासस्थान, दिल्लीतील रिलायन्स सेंटर आणि दिल्ली, नोएडा, पुणे, मुंबई, पूर्व गोदावरी, गाझियाबाद, ठाणे, चेन्नई, कांचीपुरम आणि हैदराबादमधील अनेक मालमत्तांचा समावेश होता. पीएमएलएच्या कलम ५(१) अंतर्गत जप्ती करण्यात आल्या होत्या आणि त्यात निवासी युनिट्स, ऑफिस स्पेस आणि जमिनीचा समावेश होता.

Anil Ambani assets seized : अनिल अंबानींची आणखी १४०० कोटींची मालमत्ता 'ईडी'कडून जप्‍त
Tina Ambani : अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना ईडी कार्यालयात; जाणून घ्या प्रकरण

सर्वोच्च न्यायालयाने जारी केली नोटीस

१८ नोव्हेंबर रोजी, सर्वोच्च न्यायालयाने रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) आणि समूह कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बँकिंग आणि कॉर्पोरेट फसवणूक झाल्याचा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेवर केंद्र, ईडी, अनिल अंबानी आणि इतरांना नोटीस जारी केली होती. सरन्‍यायाधीश बीआर गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याचे आणि माजी केंद्रीय सचिव ईएएस शर्मा यांचे प्रतिनिधित्व करणारे वकील प्रशांत भूषण यांच्‍या युक्‍तीवादानंतर तीन आठवड्यांत उत्तर मागितले. या याचिकेत आर्थिक विवरणपत्रे बनावट करणे, सार्वजनिक निधीचे पद्धतशीरपणे वळवणे आणि रिलायन्स एडीए समूहाच्या संस्थांमध्ये संस्थात्मक सहभाग असल्याचा आरोप आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news