

श्रीकाकुलम; वृत्तसंस्था : आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात शनिवारी (दि.1) वेंकटेश्वर मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान नऊ भाविकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले. ‘याला कोणीही जबाबदार नाही, ही देवाची करणी होती.’ असे वक्तव्य आता ज्यांनी मंदिर उभारले, त्या 94 वर्षीय हरी मुकुंदा पांडा यांनी केले आहे.
या मंदिराला स्थानिक लोक मिनी तिरुपती म्हणून ओळखतात. या दुर्घटनेनंतर पांडा म्हणाले, चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी पांडा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पांडा यांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, त्यांनी एकादशी कार्यक्रमाबद्दल स्थानिक प्रशासनाला माहिती दिली नव्हती. ‘मी माझ्या खासगी जमिनीवर मंदिर बांधले. मी पोलिसांना किंवा प्रशासनाला माहिती का द्यावी?’ त्यांनी विचारले. तसेच कितीही गुन्हे दाखल करा, मला काही अडचण नाही, असे आव्हानही त्यांनी प्रशासनाला दिले आहे.
कठोर कारवाई करणार : चंद्राबाबू
दरम्यान, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, पांडा यांनी पोलिसांना आधीच माहिती दिली असती, तर गर्दीचे व्यवस्थापन करण्याची व्यवस्था करू शकले असते. त्यांनी या प्रकरणात कठोर कारवाईचे आश्वासनही दिले.