

पुढारी ऑनलाईन डेस्कः
इस्त्रायलमधी दक्षिण प्रातांत १९१३ साली सापडलेल्या शिलालेखाचा सॉदबी या संस्थेतर्फे लिलाव होणार आहे. एका अंदाजानुसार याला २ दशलक्ष डॉलर इतकी रक्कम मिळू शकते. हा शिलालेख १५०० वर्षे जुना असून यावर बायबलमधील जुन्या करारातील १० आज्ञा कोरलेल्या आहेत. रोमन बेंझानटीन काळातील असलेला हा लेख खूप वर्षे दुर्लक्षित राहिला होता.
११५ पौंड वजनाचा व २ फुट उंच असलेला हा शिलालेख दक्षिण इस्त्रायलमध्ये रेल्वे लाईन टाकताना सापडला होता. ज्याठिकाणी हा शिलालेख सापडला होता त्या परिसरात मशीद, सिनेगॉग व चर्च अशी प्रार्थनास्थळे होती. हा प्राचिन शिलालेख असेल असे कुणालाही माहीत नव्हते, साधा दगड असेल असे समजून एका व्यक्तिने घराबाहेर अंगणात फरशी म्हणून याचा वापर केला होता. दवळपास तीन दशके हा दगड अगंणातील फरशी म्हणून बसवला गेला होता. अनेक वर्षे पायाखाली असल्याने त्यावरील अक्षरे झिजत चालली होती. पण एका संशोधकाने तो शोधून काढला.
आता या शिलालेखाची पुढील महिन्यात न्यु यॉर्क येथे होणाऱ्या लिलावात विक्री होणार आहे. यापूर्वी हा शिलालेख १९४३ साली एका अज्ञात व्यक्तिकडून खरेदी केल्याचा उल्लेख आहे. बायबलमधील ज्युन्या करारातील पाच पुस्तकांवर आधारित समार्थीजम हा प्राचिन धर्म आहे. हा एकेश्वरवादी धर्म असून या धर्माशी निगडीत काही तत्वे या शिलालेखावर कोरलेल्या आज्ञांमध्ये आहेत.
रोमन साम्राजाज्याने चौथ्या ते सहाव्या शतकात ज्याठिकाणी विध्वंस केला होता त्याच ठिकाणी हा शिलालेख सापडला आहे. यावर २० ओळी कोरल्या आहेत. ज्यू आणि ख्रिश्चन धर्मीयांच्या पंरपरांशी त्या साधर्म्य असलेल्या आहेत. पुढील महिन्यात १८ डिसेंबर रोजी न्युयार्क मध्ये याचा लिलाव होणार आहे. त्यापुर्वी ५ डिसेंबरपासून हा पाहण्यासाठी सॉदबीच्या शोरुममध्ये ठेवण्यात येणार आहे. या शिलालेखाला २ लक्ष डॉलर इतकी रक्कम मिळेल असा अंदाज सॉदबीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कारण गेल्या वर्षी याच संस्थेने केलेल्या लिलावात १००० वर्षे जुने असलेले हिब्रू भाषेतील बायबल ३८.१ दशलक्ष डॉलर्सला विकले गेले होते.