

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठा डेअरी ब्रँड अमूलने ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. कंपनीने तूप, लोणी, आईस्क्रीम, पनीर आणि चॉकलेटसह 700 हून अधिक उत्पादनांच्या पॅकच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे.
गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने सांगितले की, हे बदल 22 सप्टेंबरपासून लागू होतील. कंपनीने म्हटले आहे की, जीएसटी दरातील कपातीचा संपूर्ण फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाईल.
नवीन दरांनुसार, 100 ग्रॅम लोण्याची कमाल किरकोळ किंमत 62 रुपयांवरून 58 रुपये करण्यात आली आहे. तुपाच्या किमतीत 40 रुपयांची कपात करण्यात आली असून, ते आता 610 रुपये प्रति लिटर दराने मिळेल. एवढेच नाही, तर अमूल प्रोसेस्ड चीज ब्लॉक (1 किलो) आता 545 रुपयांना मिळेल, तर पूर्वी त्याची किंमत 575 रुपये होती.